मी माफी मागायला आलोय… उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..

शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आज परभणी दाैऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बंडखोर खासदार संजय जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी खासदार निधीसाठी गेले पण ते खासगी निधीसाठी गेल्याचे म्हटले.

मी माफी मागायला आलोय... उद्धव ठाकरे यांनी मागितली माफी, खासदार संजय जाधव यांच्यावर थेट टीका..
Uddhav Thackeray
| Updated on: Jun 28, 2026 | 11:22 AM

शिवसेना नेते उद्धव ठाकरे आज परभणी दाैऱ्यावर आहेत. खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केल्यानंतर आज उद्धव ठाकरे परभणीत आहेत. यादरम्यान ते पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. परभणी मतदार संघ कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. याच बालेकिल्लाला शिवसेना शिंदे गटाने मोठी सुरूंग लावली. परभणीत मोठा धक्का ठाकरे गटाला बसला. उद्धव ठाकरे यांच्यासोबत या दाैऱ्यावर संजय राऊत देखील आहेत. खासदार निधीसाठीच गेले पण ते खासगी निधीसाठी गेल्याचे सांगताना उद्धव ठाकरे दिसले. यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की,  या सभा नाहीये, कार्यकर्त्यांना भेटायला आलोय. परभणीकरांना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी शिवसेनेला महापौर दिला आहे. कालपासून कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या. कार्यकर्त्यांची आणि लोकसभेला ज्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांना विजयी केलं. त्यांची माफी मागायला आलोय.

एका गोष्टीचा अभिमान आहे, काही गोष्टींना विचित्र पार्श्वभूमी असते. परभणी हिंगोलीत एक आहे, इथून निवडून गेलेले असतात त्यांना परत निवडून दिलं जात नाही. कालांतराने ते गद्दारी करतात. पण मतदार शिवसैनिक कायम शिवसेनेसोबत राहिले आहेत. ते आताही सोबत राहतील. लक्ष दिलं असतं ना त्यांच्या बऱ्याच भानगडी काढल्या असत्या, म्हणत थेट संजय जाधव यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला.

पुढे उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, वरवरच्या उपाययोजना करून चालणार नाही. गद्दारीच्या मुळावर घाव घातला पाहिजे. गद्दार शिरोमणी मुंबईत आहे. मिंधे सेना. लोकांनी त्यांच्या उमदेवारांना ठरवून पाडलं पाहिजे. ही गद्दारीची कीड ठेचली पाहिजे. नाही तर लोकशाही वाचणार नाही. काही लोकांनी आईची शपथ घेतली होती. त्यांना शपथेची दुष्परिणाम दिसतील.

खासगी निधीसाठी ते गेले आहेत. खासदार फंड किती खर्च झाला तो त्यांनी खर्च केला नाही. तुम्हीच बातम्या दाखवल्या. आमच्या खासदारांकडे त्यांचा हजेरीपट आहे. किती वेळा लोकसभेत मतदारसंघाच्या प्रश्नावर तोंड उघडलं. किती वेळा संबंधित मंत्र्यांकडे जाऊन प्रश्न सोडवला. अंतर्गत गटबाजी नाही. पण सर्वकडेच दिसते. हे ऑपरेशन टायगर नाव दिलं. पण ऑपरेशन देवेंद्र आहे का. हे त्यांच्या अंतर्गत गटबाजी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊ द्यायचं नसेल. त्यांना पंतप्रधान होऊ द्यायचं नसेल. म्हणून कुणाची तरी ही खेळी असावी.

Follow Us