AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा भूकंप, एकनाथ शिंंदे दिल्लीला रवाना होताच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे, याचा मोठा फटका हा त्यांचाच मित्र असलेल्या शिवसेना शिंदे गटाला बसला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून आता नाराजीचा सूर उमटत आहे.

मोठा भूकंप, एकनाथ शिंंदे दिल्लीला रवाना होताच महाराष्ट्रात वेगवान राजकीय घडामोडी
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 19, 2025 | 5:22 PM
Share

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, नगर पालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या अनेक ठिकाणी स्वबळावर लढवल्या जात आहेत, तर काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतदानाचं गणित बघन युती आणि आघाडीचा निर्णय घेतला जात आहे. दरम्यान दुसरीकडे सर्वच पक्षांनी या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षांतर देखील जोरदार सुरू आहे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात जास्त इनकमिंग हे भाजपमध्ये झालं आहे. महाविकास आघाडीमधील इच्छूकांनी तर भाजपमध्ये प्रवेश केलाच मात्र दुसरीकडे भाजपकडून या निवडणुकीमध्ये आपलेच मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाला देखील मोठा धक्का बसला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये मोठ्या संख्येनं इनकमिंग सुरू असल्यानं शिवसेना शिंदे गटात सध्या नाराजीचं वातावरण आहे. शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार देखील घातला होता. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आहेत, एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच आता महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

कल्याण -डोंबिवलीमध्ये मोठा राजकीय भूकंप पहायला मिळत आहे. महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच आता शिवसेना शिंदे गटाकडून धनुष्यबाणाचा प्रचार सुरू झाला आहे.  जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी आता थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना अल्टिमेटमचं दिला आहे. कल्याण -डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून भाजपला थेट युती तोडण्याचं आव्हान देण्यात आलं आहे.  ​भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगमुळे शिंदे गट देखील आता ॲक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटानं आता थेट प्रचार सुरू केला आहे.  एकनाथ शिंदे यांच्या विकास कामामुळे 56 वरून 80 नगरसेवक निवडून आणायला वेळ लागणार नाही, असंही यावेळी अरविंद मोरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान कल्याण -डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटानं घेतलेल्या या भूमिकेमुळे  राजकीय वर्तुळात खबळबळ उडाली आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...