AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, मुंबईतून मोठी बातमी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत, दरम्यान आता पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, मुंबईतून मोठी बातमी
उद्धव ठाकरे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 13, 2025 | 4:15 PM
Share

निवडणूक आयोगाकडून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला मत मोजणी होणार आहे. दरम्यान अद्याप महापालिकेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली नाही, मात्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक होताच राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा देखील होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. राज्यातली राजकीय परिस्थिती पहाता महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे,  मुंबई महापालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. यावेळी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे.  मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.  आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना मुंबई महापालिकेसाठी आमची शंभर जागा लढवण्याची तयारी आहे, असं मोठं वक्तव्य देखील सुर्वे यांनी यावेळी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले सुर्वे? 

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आमची 100 जागा लढवण्याची तयारी आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात सात जागा आहेत, आणि या सातही जागा आम्ही मागणार. आम्ही या सर्व जागा जिंकणार असा आमचा विश्वास आहे. महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच महापौर बसणार. आता 100 नगरसेवक आमच्याकडे आहेत आणि म्हणून 100 सीटची आम्हाला अपेक्षा असणार आहे, असं यावेळी सुर्वे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री सहायता निधी असताना ज्या लोकांच्या एका पत्रावर सही केली नाही,  गोरगरिबांना मदत केली नाही, हे सगळे जनता विसरलेली नाही. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर जनतेचं प्रेम आहे, असं यावेळी सुर्वे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली