डिलिमिटेशन बिल सादर होण्यापूर्वीच सरकारसह एकनाथ शिंदेंना ठाकरेंचा धक्का, थेट बड्या नेत्याने..
शिवसेना ठाकरे गटाने मोठी खेळी खेळली. थेट एकनाथ शिंदेंसह भाजपाला मोठा धक्का दिला. डिलिमिटेशन बिल उद्या संसदेत सादर होणार आहे, त्यापूर्वीच मोठा धक्का सरकारला दिला. 6 बंडखोर खासदारांबद्दल त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

डिलिमिटेशन बिलावरून राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शरद पवारांनी इंडिया आघाडीची साथ सोडत थेट सरकारला या विधेयकात पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. काल दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला पवारांच्या खासदारांनी पाठ फिरवली. स्वतंत्र बैठक सुप्रिया सुळे खासदारांची घेणार आहेत. इंडिया आघाडीत फूट पडली आहे. शरद पवार यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर जोरदार टीका मविआकडून केली जात आहे. काँग्रेसचे नेते तर तुटून पडले आहेत. शरद पवार सत्तेशिवाय राहूच शकत नसल्याचे मोठे विधान काँग्रेसने केले. इंडिया आघाडीत फूट पडली असली तरीही ते डिलिमिटेशनच्या विरोधातील भूमिकेवर ठाम आहेत. शरद पवार रूग्णालयात असून काल दोन तास गाैतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली.
त्यातच शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या 6 खासदारांना शिवसेना ठाकरे गटाने व्हीप जारी केला. हे खासदार शिवसेना शिंदे गटात आहेत. ऐन डिलिमिटेशनच्या विषयावरच पक्षाने त्यांना व्हीप जारी केले. हा एकनाथ शिंदे यांच्याकरिता मोठा धक्का म्हणावा लागेल. हे सहा खासदार सरकारच्या बाजूने मतदान करणार होते, याच दरम्यान हे व्हिप जारी करण्यात आले.
यासर्वांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मोठे विधान केले. आजच्या बैठकीसाठी हा व्हीप जारी करण्यात आला. जून महिन्यात या सहा खासदारांनी बंडखोरी करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अरविंद सावंत यांनी म्हटले की, माननीय लोकसभेच्या खासदारांनी पत्रात इतकेच म्हटले की, या सहा खासदारांना येण्याची अनुमती दिली.
त्यांनी त्यांच्या पक्षात येण्यास अनुमती दिली. ते त्या पक्षात गेले त्याला अनुमती दिली… नाही दिली.. कायद्याने त्यांनी अनुमती दिली नाही तर आम्ही व्हीप दिला. संसदेच्या अध्यक्षांनी यावर मत दिले नाही. सर्वाेच्च न्यायालयाचेही यावर मत आले नाही. या व्हिपला त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर त्यांच्यावर कारवाई होईल आणि व्हायलाच पाहिजे. लोकशाहीचा सन्मान राखायचा असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवे.