युती झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचं पाहिलं आंदोलन कुठे? युती झाल्यानंतर पाहिलं आंदोलन कशासाठी?

| Updated on: Jan 27, 2023 | 10:33 AM

वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या युतीनंतर राज्यात पहिलेच एकत्रित आंदोलन होणार आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

युती झाल्यानंतर ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीचं पाहिलं आंदोलन कुठे? युती झाल्यानंतर पाहिलं आंदोलन कशासाठी?
Image Credit source: Google
Follow us on

भूषण पाटील, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची काही दिवसांपूर्वी युती झाली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि वंचित बहुजन आघाडीच्या मोठा जल्लोष केला होता. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आल्याचं सेलिब्रेशनचं कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर युती झाल्यानंतर राज्यातील पाहिलं आंदोलन हे कोल्हापुरात केलं जात आहे. शिंदे गटासह भाजपच्या विरोधात हे आंदोलन केलं जात आहे. यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने दलित वस्तीच्या 39 कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजूरी असतानाही स्थगिती दिल्याने आंदोलन केले जात आहे. पालकमंत्री चलेजाव या आशयाखाली हे आंदोलन केले जात आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी आज युती झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये एकत्रित आंदोलन करीत आहे.

दोन्ही पक्ष पालकमंत्री चलेजाव आंदोलन करण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांच्या समाधी स्थळी एकत्र येणार आहे, त्यासाठीची संपूर्ण तयारी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

कोल्हापूर मधील दलित वस्त्यांच्या निधीला शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ पालकमंत्री चलेजाव हे आंदोलन केले जात आहे.

दलित वस्त्यांच्या 39 कोटीच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती, त्यानंतरही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी स्थगिती दिल्याचा आरोप होऊ लागला आहे.

काही दिवसापूर्वीच राज्यात ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. त्यानंतर कोल्हापूर पहिल्यांदाच हे आंदोलन केले जात असल्याने त्याकडे कोल्हापूरसह राज्यातील राजकीय नेत्यांचं लक्ष लागून आहे.