AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या राजकारणात मोठा प्रयोग? शिवसेना शिंदे गटाचा भाजपला धक्का

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे, स्थानिक पातळीवरील राजकीय गणित पाहून युती आघाडीचा निर्णय घेतला जात आहे, आता या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राज्याच्या राजकारणात मोठा प्रयोग? शिवसेना शिंदे गटाचा भाजपला धक्का
भाजप, शिवसेना Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2025 | 4:49 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं वारं वाहत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला असून, उमेदवारी अर्ज भरण्यास देखील सुरुवात झाली आहे. दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून लढवल्या जाणार का? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र याचं उत्तर आता समोर आलं आहे. राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील मतांचं गणित लक्षात घेऊन सर्वच पक्ष आघाडी आणि युतीचा निर्णय घेत आहेत. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कणकवलीमध्ये शिवसेना शिंदे गट आता थेट शिवसेना ठाकरे गटासोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याची शक्यता आहे.  कणकवलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते निलेश राणे यांनी त्याबाबत संकेत दिले आहेत.

आम्ही युती साठी सकारात्मक होतो. पण काही लोकांना आमच्यासोबत युती करायची नाही. काही जणांची आमच्यासोबत युती करण्याची इच्छा आहेत, तर आम्ही त्यांच्यासोबत युती करणार. आम्ही युतीसाठी प्रयत्न केले. राणे साहेबांनी सांगितल्यामुळे आम्ही थांबलो होतो, मात्र आता राणे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मैदानात उतरलो आहोत. आमची ताकद मोठी आहे. आमच्या अस्तित्वाची चर्चा करणाऱ्यांनी तीन तारखेला आमचे फटाके पहावेत, असं थेट आव्हानच निलेश राणे यांनी भाजपाला दिलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत आता निलेश राणे आणि भाजप नेते नितेश राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाकडून मालवनात जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, त्यावेळी ते बोलत होते.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या...

तुम्ही विद्यार्थ्यांना मारत आहात, जे दोषी आहेत, त्यांना कधी मारणार.. प्रियंका गांधी भडकल्या..

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक