AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : आज एकनाथ शिंदेंचा साताऱ्यात पावर शो, पण तो आमदार नाही दिसणार, बॅनरवरुन पण गायब, पक्षासोबत बिनसलं

Eknath Shinde : साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी राडा झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे आज साताऱ्यात येत आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यात काही महत्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहे. त्यांच्याच पक्षाचा एक आमदार या दौऱ्यात त्यांच्यासोबत दिसणार नाही.

Eknath Shinde : आज एकनाथ शिंदेंचा साताऱ्यात पावर शो, पण तो आमदार नाही दिसणार, बॅनरवरुन पण गायब, पक्षासोबत बिनसलं
Eknath Shinde
| Updated on: Apr 20, 2026 | 12:39 PM
Share

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात येत आहेत. सातारा हा एकनाथ शिंदे यांचा गृहजिल्हा आहे. एकनाथ शिंदे हे साताऱ्यात अनेकदा दरेगावी मुक्कामी येत असतात. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या राड्यानंतर एकनाथ शिंदे प्रथमच साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साताऱ्यात सभा होणार आहे. दुपारी त्यांचं अंगापूरला आगमन होईल. त्यानंतर सातारा गांधी मैदानावर सभा होणार आहे. ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सातारा जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दरम्यान राडा झाला होता. त्यानंतर प्रथमच सभा होत आहे.

कोरेगाव, खटाव तालुका जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी अनके फलक उभारण्यात आले आहेत. त्या फलकांमधून आमदार महेश शिंदे यांचा फोटो गायब आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडी दरम्यान महेश शिंदे यांनी भाजपला साथ दिली होती. त्यांच्या मर्जीतले दोन सदस्य भाजपसोबत गेले होते. तेव्हापासून शिवसेनेत त्यांच्याबद्दल नाराजी आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा ही नाराजी दिसून आली आहे.

आम्हाला बाजूला ठेवलं आहे

स्वत: महेश शिंदे टीव्ही 9 मराठीशी बोलले. “आमच्याबाबतीत असं झालं की, जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते. परंतु माझ्याइथे मी भाजप बरोबर एकत्र होतो. मी क्रमप्राप्त भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्यावेळेला आमच्या सदस्यांना, आम्हाला बाजूला ठेवलं आहे” तुम्ही आज सभेला जाणार का? त्यावर महेश शिंदे यांनी नाही असं उत्तर दिलं. आपल्या तालुक्यातले काही पक्ष प्रवेश होत आहे. “चांगली गोष्ट आहे. वाईट आहे का?. माझ्या पक्षात, माझ्या कार्यकर्त्यांचे प्रवेश आनंदाची गोष्ट नाही का?” असं महेश शिंदे म्हणाले.

त्याची मला सवय आहे

“बेसिकली तुम्ही लक्षात घ्या. महाबळेश्वरचा इतका मोठा पर्यटन महोत्सव होता, त्याला मला बोलावलं नव्हतं. पाटणमध्ये, कराडमध्ये साहेबांनी कधी बोलावलं नाही. ही पहिलीच वेळ नाहीय. हे पहिल्या दिवसापासून आहे. त्याची मला सवय आहे. मला काही वाटत नाही” असं महेश शिंदे म्हणाले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...