खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय… एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत संजय राऊतांची थेट पोस्ट..

काल महत्वाची सुनावणी कोर्टात पार पडली. शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. यानंतर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर मोठे भाष्य केले.

खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय... एकनाथ शिंदेंचा फोटो शेअर करत संजय राऊतांची थेट पोस्ट..
Eknath Shinde and Sanjay Raut
| Updated on: Aug 06, 2026 | 9:54 AM

सुप्रीम कोर्टात काल शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव यावर सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडताना मोठा दावा केला. प्रकरण जेव्हा निवडणूक आयोगात गेले, तेव्हा निकाल हा फक्त विधीमंडळ पक्षाच्या संख्येवर देण्यात आला का? हे कसे होऊ शकते? विधीमंडळ पक्ष हा राजकीय पक्षाचा भाग आहे, तो म्हणजे मूळ राजकीय पक्ष नाही. पक्षाची घटना योग्य की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाकडे नसल्याचाही दावा यादरम्यान त्यांनी केला. कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला. ज्यानंतर पुन्हा सुनावणी होणार आहे. यानंतर संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिली. शिवसेना शिंदे गटाबाबतही मोठा युक्तीवाद झाला. कपिल सिब्बल यांनी काही महत्वाचे दावेही केले. आजही दोननंतर सुनावणी होणार आहे.

यादरम्यानच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टसोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही शेअर केला. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, आमचा देशाच्या संविधानावर विश्वास आहे…. यांचा खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय..

या बाबत आमच्या मनात शंका नाही! जय महाराष्ट्र! आता संजय राऊत यांची ही पोस्ट तूफान व्हायरल होत आहे. लोक या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. शिवसेना चिन्ह आमच्याकडेच राहिल असाही दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला. शिवसेना पक्ष फुटलाच नाही, असाही मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

कोर्टाने पुढाकार घेऊन बंधन टाकली पाहिजेत, असेही मोठे विधान संजय राऊत यांच्याकडून करण्यात आले. काल काही  वेळ कोर्टात युक्तीवाद सुरू होता. संजय राऊत यांनी कोर्टाच्या सुनावणीनंतर मोठी प्रतिक्रिया दिली. शिवसेना शिंदे गटावर काही कारवाई होणार का? असा सवालही यादरम्यान उपस्थित होत आहे. संविधानावर आमचा विश्वास असल्याचेही राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us