AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधिमंडळ पक्षात फूट पण…निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाही, शिवसेना पक्षफुटीवर कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

बंडखोरी झाली तेव्हा दोन्ही पक्षांनी पक्षाच्या संघटनेची कागदपत्रे सादर केली होती. परंतु विधीमंडळ पक्षाच्या बहुमतावरच पक्षाचे चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यात आला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

विधिमंडळ पक्षात फूट पण...निवडणूक आयोगाला तो अधिकारच नाही, शिवसेना पक्षफुटीवर कपिल सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद
eknath shinde and uddhav thackeray and shivsena hearing in supreme courtImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 11, 2026 | 4:01 PM
Share

Shivsena Party And Supreme Court Hearing : सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या मालकीबाबत सुनावणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत. याआधीही 6 ऑगस्ट रोजीच्या सुनावणीत त्यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. आता पुन्हा एकदा सिब्बल यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात आली आहे. आजच्या (11 ऑगस्ट) सुनावणीतही कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करत आहेत. आजच्या सुनावणीत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने चुकीच्या आधारे पक्षफुटीबाबत निर्णय घेतला, असा दावा सिब्बल यांनी यावेळी केला.

कोर्टात नेमकं काय झालं? सिब्बल यांचा युक्तिवाद काय?

कपिल सिब्बल यांनी आजच्या सुनावणीत निवडणूक आयोग आणि पक्षांतराचा नियम याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. विधिमंडळ पक्षात फूट पडली म्हणजे राजकीय पक्षातही फूट पडली, असा त्याचा अर्थ होत नाही. एक तृतीयांश सदस्यांच्या गट स्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता असणे गरजेचे आहे. ही मान्यता नसेल तर संबंधित गटाला अन्य पक्षात विलीन व्हावे लागते, असे सिब्बल यावेळीम म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून…

बंडखोरी झाली तेव्हा दोन्ही पक्षांनी पक्षाच्या संघटनेची कागदपत्रे सादर केली होती. परंतु विधीमंडळ पक्षाच्या बहुमतावरच पक्षाचे चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यात आला. शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्याचा प्रयत्न झाला, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.

परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला अधिकारच नाही

कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे चार भाग केले असून त्यावर वेगवेगले आक्षेप घेतले आहेत. फूट पडली असेल तर ती राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षातही पडणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षात फूट पडली, असा निष्कर्ष काढला. पक्षफुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हा वेगळा असतो. विधिमंडळ पक्षात फूट पडली, राजकीय पक्षात फूड पडलेली नाही, असेही सिब्बल आपल्या युक्तिवादात म्हणाले. परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असा मोठा युक्तिवादही त्यांनी केला.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत