ठाकरे गटात मोठी खळबळ, महत्त्वाच्या नेत्याला तडकाफडकी पदावरून काढलं; पडद्यामागे काय घडतंय?
Shivsena UBT : शिवसेना ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. एका बड्या नेत्याला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आलं आहे.

गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळालं होतं. यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. आताही ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता ठाकरे गटात मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. एका बड्या नेत्याला तडकाफडकी पदावरून हटवण्यात आलं आहे. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
परभणी जिल्हाप्रमुखाची उचलबांगडी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून परभणी जिल्हा प्रमुखाला तडकाफडकी पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गंगाप्रसाद आनेराव यांच्याऐवजी विष्णू मुरकुटे यांची परभणी जिल्हा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख पदी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करून खासदार संजय (बंडू जाधव ) यांना ठाकरेंनी मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
बैठकीला मारली होती दांडी
शिवसेना भवन येथे 25 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीमध्ये खासदार संजय जाधव आणि त्यांचे काही समर्थक परभणी लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अनुपस्थित होते. यामध्ये गंगाप्रसाद आनेराव यांचाही समावेश होता. तसेच उपजिल्हाप्रमुख आणि काही तालुकाप्रमुख हे अनुपस्थित असल्याचा समोर आलं होतं. त्यामुळेच आता गंगाप्रसाद आनेराव यांची जिल्हा अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
खासदार संजय जाधव यांना धक्का
खासदार संजय जाधव हे शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून आहेत. त्यामुळे परभणी जिल्ह्यात काही संघटनात्मक बदल उद्धव ठाकरेंकडून केली जात असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये जिल्हाप्रमुखाची बदली करून संघटनात्मक बदलांमध्ये खासदार संजय जाधव यांच्या समर्थकाला बाजूला करून हा पहिला धक्का उद्धव ठाकरेंनी दिल्याचं दिसत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परभणी आणि गंगाखेड या दोन विधानसभा मतदार संघांची जबाबदारी गंगाप्रसाद आनेराव यांच्याकडे होती, मात्र आता त्यांच्या जागी विष्णू मुरकुटे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.