मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, पती शशांकने 8 दिवस…

वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. तिच्या मृत्यूपूर्वी नेमकं काय झालं होतं याविषयी माहिती दिली आहे.

मोठी बातमी! वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून धक्कादायक खुलासा, पती शशांकने 8 दिवस...
Vaishnavi Hagavane
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: May 29, 2025 | 2:51 PM

पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. 16 मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली. मुलीने उचलल्या पाऊलानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना अटक केली आहे. आता तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

काय आहे नवा खुलासा?

संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या कुटुंबाची कसून चौकशी करताना दिसत आहेत. आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेला आत्महत्येपूर्वी, पती शशांक हगवणेकडून वेगवेगळ्या हत्यांरांचा वापर करुन मारहाण करण्यात आली. पोस्टमॉर्टन रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवणेच्या अंगावर जखमा आढळल्या. त्यामुळे आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांना सतावत आहेत.

वाचा: हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का

मृत्यूपूर्वी 8 दिवस मारहाण

वैष्णवीला मारहण्यात करण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. सलग 8 दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला हगवणे कुटुंबातील सर्व सदस्यांचे बँक अकाऊंट गोठवण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पुस्तूलाचा परवानाही रद्द करण्यात यावा अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणे वैष्णवीला वारंवार मानसिक त्रास देत असल्याचे देखील समोर आले आहे. निलेश चव्हाण हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा तपास अजून लागलेला नाही.