AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का

वैष्णवी हगवणेचे संपूर्ण कुटुंब सध्या तुरुंगात आहे. हुंड्यासाठी छळ झालेल्या वैष्णवीच्या सासऱ्यांकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का
Rajendra HagavaneImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 25, 2025 | 2:08 PM
Share

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलंय. या प्रकरणात फरार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबानं सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप केलेत. त्यानंतर आता हगवणेंकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

हगवणेची एकूण संपत्ती किती?

राजेंद्र हगवणे हा पुण्याजवळील मुळशीतला. मुळशी पॅटर्न सिनेमामध्ये ज्या प्रकारे अचानक जमिनींना भाव आल्यानंतर अनेक गुंठा मंत्री बनले हगवणेही त्याच मानसिकतेचा. दिवसरात्र फक्त पैसा पैसा करायचा. मुळशीतल्या भुकुम गावामध्ये हगवणेची 12 एकर जमीन आहे. भुकुम गाव हे जवळपास आता पुणे शहरातच मोजलं जातं. कारण अवघ्या काही मिनिटांवर म्हणजेच जवळपास 7 किलोमीटवर हे गाव वसलेलं आहे. इथे वन बीएचकेचा रेट ५० लाख रुपये आहे. अशा भागात हगवणेंची 12 एकर जमीन आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार इथे गुंठ्याचा भाव 30 लाख रुपये आहे. म्हणजे हगवणे जवळपास 144 कोटी रुपयांच्या जमीनीचा मालक आहेत. त्याच्याकडे अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. बंगले आहेत, पुण्यात फ्लॅट आहेत, फ्लॉट आहेत, मोठाल्या मशीन आहेत. या सगळ्याची किंमत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. हगवणेची ही प्रॉपर्टी कष्टाची नाहीये. ती वडिलोपार्जित आहे. वाचा: वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?

हगवणेचे वडील राजकीय प्रस्थ

राजेंद्र हगवणेचे वडील तुकाराम हगवणे हे या भागातील राजकीय प्रस्थ होतं. आधी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते राष्ट्रवादीत आले. तुकाराम हगवणे पंचायत समितीचे सभापती होते. तसेच ते पुणे जिल्हा परिषदेतही होते. पण राजेंद्र हगवणे कधीच तेथून निवडून आला नाही. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2004 साली राजेंद्र मुळशी विधानसभा लढला. पण त्याला यश मिळाले नाही. तो सपाटून पडला. नंतर पंचायत समिती, भुकुल ग्रामपंचायतीमध्ये देखील तो चांगलाच हरला. त्याला गावकऱ्यांनी कधीही पाठिंबा दिला नाही. मात्र, पवार कुटुंबाशी संबंध असल्यामुळे तो सत्ताधीश असल्यासारखा वावरायचा. मुळशी विभागातील प्लॉटिंगचा व्यवहारात त्याने करोडो रुपये छापले. वैष्णवीचा नवरा हा पोकलेन, जेसीबी आणि डंपरचा त्याचा व्यवसाय होता.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.