AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची ‘करिश्मा’ आहे तरी कोण?

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर सध्या हगवणे कुटुंबीय चर्चेत आहे. वैष्णवीच्या हत्येला खरी जबाबदार तिची नणंद करिश्मा असल्याचे म्हटले जात आहे. ही करिश्मा आता नेमकं करते तरी काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वय 34 वर्ष, अविवाहित ते लक्ष्मीतारा कंपनी; वैष्णवीचा सतत छळ करणारी नणंद, हगवणेंची 'करिश्मा' आहे तरी कोण?
Karishma HagavaneImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 23, 2025 | 2:27 PM
Share

वैष्णवी हगवणे हिनं तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या वडिलांनी अनिल कस्पटे यांनी वैष्णवीचा तिचा नवरा शशांक, सासू लता, नणंद करिश्मा, सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांनी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची तक्रार दाखल केली. यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असं ही सांगितलं. तसेच हगवणेंची थोरली सून मयूरी जगतापने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. तिने वैष्णवीचा सर्वाधिक छळ नणंद करिश्माने केला असेल असे म्हटले आहे. त्यानंतर करिश्मा ही आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

करिश्मा हगवणे, वैष्णवीची नणंद या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. ती हगवणे कुटुंबातील पहिले अपत्य आहे. ती 34 वर्षांची असून अद्याप अविवाहित आहे. पण घरातले सगळे निर्णय तिच घेते, असं म्हणतात. ती ‘पिंकीताई’ म्हणून ओळखली जाते. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावले आणि त्रास दिला, असा आरोप आहे. वाचा: माझे पती नसताना हे लोक…; हगवणे कुटुंबीयांच्या मोठ्या सुनेचा खळबळजनक खुलासा

काय करते करिश्मा?

करिश्मा ही फॅशन डिझायनर आहे. लक्ष्मीतारा या नावाने तिने एक कंपनी सुरु केली आहे. करिश्मा ही पालकांसोबतच मुळशीमध्ये राहाते. संपूर्ण हगवणे कुटुंबावर करिश्माची सत्ता होती. घरात कोणी कोणाशी कसं वागायचे हे करिश्मा ठरवत असे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मयूरी एकाच छताखाली राहात असताना देखील करिश्माने त्यांना एकमेकींशी बोलण्यास, भेटण्यास मनाई केली होती.

करिश्माचा त्रास फक्त वैष्णवीपुरता मर्यादित नव्हता. हगवणे कुटुंबाची दुसरी सून, मयुरी जगतापने करिश्मावर गंभीर आरोप केले. मयुरी म्हणते की करिश्मा आणि तिच्या कुटुंबाने तिलाही मारहाण केली, मानसिक छळ केला. गावात कोणाशी बोलू नये म्हणून करिश्मा आणि तिची आई लता मयुरीला अडवायच्या. वैष्णवीच्या बाळाला मयुरीला भेटू द्यायचे नाहीत, असेही तिने सांगितले. मयुरीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पौड पोलिसांत तक्रार दाखल केली होती, पण राजकीय दबावामुळे ती दाबली गेली, असा तिचा दावा आहे.

वैष्णवीच्या बाळाचं काय?

वैष्णवीचे १० महिन्यांचे बाळ आता तिच्या माहेरच्या कस्पटे कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. महाराष्ट्र महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर हा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला बाळ राजेंद्रच्या मावस भावाकडे होते, पण एका अज्ञात व्यक्तीने ते कस्पटे कुटुंबाला दिले. बाळाच्या ताब्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबाला निलेश नावाच्या व्यक्तीने धमकावल्याचा आरोपही आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी