ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला, पाणी थेट खासदार श्रीनिवास पाटलांच्या घरात, तहसीलदारांचे कारवाईचे आदेश

| Updated on: Jun 02, 2021 | 4:28 PM

मान्सूनपूर्व पावसाच्या मोठ्या सरी बरल्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. हे पाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलला, पाणी थेट खासदार श्रीनिवास पाटलांच्या घरात, तहसीलदारांचे कारवाईचे आदेश
ओढ्याचं पाणी श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानात शिरलं
Follow us on

दिनकर थोरात, टीव्ही 9 मराठी, सातारा : नैसर्गिक ओढा बुजवल्याने, तसंच ओढ्यावर बिल्डरने केलेल्या अतिक्रमणाचा फटका साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांना बसला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या मोठ्या सरी बरल्यामुळे ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आलं. हे पाणी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या घरात शिरल्याचं चित्र पाहायला मिळालं. याबाबतची माहिती कराडचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिलीय. कराडजवळ असलेल्या गोटे गावात श्रीनिवास पाटील यांचं निवासस्थान आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे पाटील यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयात पाणी शिरलं. (water of the stream entered the house of MP Srinivas Patil  in Karad)

ओढा बुजवून, त्यावर अतिक्रमण करुन ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यात आला आहे. मोठा पाऊस आल्यामुळे ओढ्यातील पाणी बाहेर पडलं आणि ते खासदार पाटील यांच्या निवासस्थानात आणि कार्यालयात घुसल्याचं समोर आलंय. दरम्यान, पाटील यांच्या निवासस्थानी, तसंच कार्यालयात पाणी शिरलं असलं तर या दोन्ही ठिकाणी जास्त नुकसान झालेलं नाही, अशी माहिती तहसीलदारांकडून देण्यात आलीय. असं असलं तरी ओढ्यावरील अतिक्रमणाची चौकशी करुन कारवाई केली जाईल, असं आश्वासन तहसीलदारांनी दिलं आहे.

अतिक्रमण असेल तर काढण्यात येईल- तहसीलदार

अचानक मोठा पाऊस पडला होता. पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. मात्र खासदार साहेबांच्या निवासस्थानाचे नुकसान जास्त प्रमाणात झालेलं नाही. अतिक्रमणाबाबत आम्ही पाहणी केली आहे. तलाठी आणि सर्कल यांना प्रवाह नैसर्गिक करण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. बांधकाम मोठे असून सदरच्या बांधकाम व्यावसायिकांने परवागी घेतली असेल असे वाटते. मात्र तरीही त्याची सर्व माहिती घेवून योग्य ती कारवाई केली जाईल. तसंच व्यावसायिकाने अतिक्रमण केले असल्यास काढण्यात येईल अशी माहिती तहसिलदार अमरदीप वाकडे यांनी दिली आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यानं अतिक्रमण केल्याचा आरोप

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह आजूबाजूच्या शेतकऱ्यांनाही ओढ्यावरील अतिक्रमणाचा आणि नैसर्गिक प्रवाह बदलल्याचा फटका बसला आहे. ओढ्यावरील अतिक्रमण काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याचं आहे. ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्यास तो काँग्रेस पदाधिकारीच जबाबदार आहे, असा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय. दरम्यान, या बिल्डरच्या अतिक्रमणचा फटका खासदार महोदयांना बसला आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई केली जाणार का? हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या :

फडणवीस, महाजनांच्या मनात नाथाभाऊंविषयी कटुता नाही; भेटीचा राजकीय अर्थ काढू नका: रक्षा खडसे

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

water of the stream entered the house of MP Srinivas Patil  in Karad