Solar Eclipse| सूर्यग्रहण पाहण्याची संधी! मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, वाचा कुठे किती वेळ दिसेल?

| Updated on: Oct 25, 2022 | 9:36 AM

राज्यातील तसेच देशातील कोणत्या भागात सूर्यग्रहण किती वाजता सुरु होईल, किती वाजता संपेल, वाचा सविस्तर...

Solar Eclipse| सूर्यग्रहण पाहण्याची संधी! मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, वाचा कुठे किती वेळ दिसेल?
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबईः ऐन दिवाळीत महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना एका महत्त्वाच्या खगोलीय घटनेचा साक्षीदार होता येणार आहे. आज मंगळवारी खंडग्रास सूर्यग्रहण (Continental Solar Eclipse) अनुभवण्याची संधी आहे. या ग्रहणकाळात भारतात सूर्याचे (Sun) बिंब धूसर होईल. भारतीयांना 43 टक्के सूर्याचा भागस दिसू शकेल. शास्त्रज्ञांच्या मते, हे सूर्यग्रहण (Solar Eclipes) उघड्या डोळ्यांनी पाहणं धोकादायक ठरू शकतं.

सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय?
सूर्य आपल्या कक्षेत भ्रमण करत असतो. मात्र जेव्हा सूर्य आमि पृथ्वीच्या मध्यभागी चंद्र येतो. तेव्हा आपल्याला सूर्य दिसू शकत नाही. यालाच सूर्यग्रहण म्हणतात. अंशतः सूर्यग्रहण म्हणजेच जेव्हा चंद्रामुळे सूर्याची काही किरणं पृथ्वीपर्यंत येण्यापासून रोखली जातात. यालाच पार्शिअल किंवा अंशतः सूर्यग्रहण असं म्हणतात. भारतात यापुढील सूर्यग्रहण 2 ऑगस्ट 2027 रोजी दिसेल. ते पूर्ण सूर्यग्रहण असेल.

आता राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आजचं सूर्यग्रहण किती वाजता दिसेल हे पाहुयात-

– मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणाला सुरुवात होईल. ग्रहणाचा मध्यबिंदू 5.43 वाजता होईल. त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकणार आहे. हे सूर्यग्रहण सूटण्याआधीच सायंकाळी 6.08 वाजता सूर्यास्त होईल.

इतर शहरात कसे?

  • पुणे- प्रारंभ- 4.51 सूर्यास्त-6.31
  • नाशिक- प्रारंभ-4.47 सूर्यास्त-6.31
  • नागपूर- प्रारंभ-4.49 सूर्यास्त-6.29
  • कोल्हापूर- प्रारंभ-4.57 सूर्यास्त-6.30
  • औरंगाबाद- प्रारंभ-4.49 सूर्यास्त-6.30
  • सोलापूर- प्रारंभ-4.56 सूर्यास्त-6.30

वैदिक पंचांगानुसार, सूर्यग्रहण नेहमीच अमावस्येच्या तिथीला असते. यावेळी कार्तिक अमावस्या म्हणजेच 25 ऑक्टोबर रोजी अंशतः सूर्यग्रहण होतेय. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, देशातील उत्तर आणि पश्चिमेकडील भागांना हे सहज दिसेल. तर पूर्वेकडील भागात ग्रहण दिसणार नाही. कारण इथे सूर्यग्रहण लवकर होईल.

म्हणजेच देशातील दिल्ली, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू, श्रीनगर, लेह आणि लडाखमध्ये सूर्यग्रहण स्पष्ट अनुभवता येईल.

तर दक्षिण भारतातील तमिळनाडू, कर्नाटक, मुंबई, आध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, बिहार, छत्तीसगड, झारखंड, आणि बंगालमध्ये काही वेळ सूर्यग्रहण दिसेल.

तसेच देशातील पूर्वेकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि नागालँड या भागात सूर्यग्रहण दिसणार नाही.