यंदाही गतवर्षीसारखा पालखी सोहळा एसटीतून आणा, अन्यथा गाव बंद ठेवणार, वाखरी ग्रामस्थांचा इशारा

| Updated on: Jun 06, 2021 | 3:45 PM

पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामस्थांनी यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक पद्धतीनं करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. Wakhari Ashadhi Palkhi Sohala

यंदाही गतवर्षीसारखा पालखी सोहळा एसटीतून आणा, अन्यथा गाव बंद ठेवणार, वाखरी ग्रामस्थांचा इशारा
वाखरी ग्रामपंचायत
Follow us on

सोलापूर: पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामस्थांनी यंदाची आषाढी वारी प्रतिकात्मक पद्धतीनं करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षी एसटीतून पालखी सोहळा संपन्न झाला होता. त्याप्रमाणं यंदा देखील पालख्या एसटीतून आणाव्यात, अशी मागणी वाखरी ग्रामस्थांनी केली आहे. वाखरी ग्रामपंचायतीच्यावतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालखी सोहळ्याची प्रमुख संस्थानं यांना पत्र लिहिण्यात आलं आहे आहे. ( Solpaur Pandharpur Wakhari villagers demanded Ashadhi Palkhi Sohala conduct like previous year)

पालखी मार्गावर वाखरी महत्वाचं गाव

पंढरपूरच्या आषाढी वारीच्यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी सोहळ्यातिल शेवटचे गोल रिंगण वाखरीमध्ये होते. वाखरी ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रतिकात्मक पद्धतींनं स्वरूपात साजरा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे, असं गावच्या सरपंच कविता पोरे यांनी सांगितलं आहे. जर का पायी वारीला परवानगी दिली तर वाखरी गाव बंद ठेवू असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय.

गतवर्षीप्रमाणं पालखी सोहळा एसटीमधून आणा स्वागत करु

यंदाही गत वर्षीप्रमाणे एस टी बस मधून, मोजक्या वारकऱ्यांसह प्रातिनिधीक स्वरूपात पालखी सोहळा साजरा करावा, आम्ही एसटीतून आलेल्या पालखी सोहळ्याचं स्वागत करु, असं वाखरी ग्रामस्थ म्हणाले.

वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम

आता कोरोना संसर्ग कमी होत असला तरी सोलापूर जिल्ह्यात आणि पंढरपूर तालुक्यासह वाखरी गाव कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. वाखरी या गावात सर्वच संतांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम असतो. दोन वर्षांनी पालखी सोहळे आले तर इथे मोठी गर्दी होऊ शकते. पंचक्रोशीतील भाविक वाखरीत गर्दी करु शकतात, त्यामुळं संसर्ग वाढू शकतो, असं मत वाखरी ग्रामस्थांनी व्यक्त केलं.

वाखरी गावात कोरोनानं 30 जणांचा मृत्यू

वाखरी गावात जवळपास 800 कोरोनाबधित रुग्ण सापडले होते. तर 30 पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 30 पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या परिस्थितीत पायी आषाढी यात्रा सोहळा झाला तर वाखरी गाव बंद ठेवून निषेध व्यक्त केला जाणार असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. आता प्रशासन व पालखी सोहळा प्रमुख काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा:

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसची पेट्रोल पंपावर निदर्शने; सोमवारी 1 हजार ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन

महामारीत कुठेच बेड मिळेना, हतबल कुटुंबाला पोलिसांची साथ, कृतज्ञता व्यक्त करताना रुग्णाच्या भावाचे डोळे पाणावले

( Solpaur Pandharpur Wakhari villagers demanded Ashadhi Palkhi Sohala conduct like previous year)