वाल्मिक कराडचा तुरुंगातच गेम करण्याचा प्लॅन? सुगावा लागताच पडद्यामागे मोठ्या हालचाली!

वाल्मिक कराड ज्या तुरुंगात आहे, त्या तुरुंगात संशयास्पद हालचाली आढळल्या आहेत. त्यामुळेच तुरुंगा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

वाल्मिक कराडचा तुरुंगातच गेम करण्याचा प्लॅन? सुगावा लागताच पडद्यामागे मोठ्या हालचाली!
walmik karad
| Updated on: Jul 02, 2025 | 3:01 PM

Walmik Karad : गेल्या अनेक महिन्यांपासून बीड जिल्हा हा वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. नुकतेच येथे एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन प्राध्यापकांनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. तसे आरोप केले जात आहेत. असे असतानाच आता मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक करडला तुरुगांतच संपवण्यासाठी कट रचला जात होता.पोलिसांना याचा सुगावा लागताच आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. मात्र या तुरुंगात काही संशयास्पद हालचाली आढळल्या होत्या. ही बाब लक्षात येताच तुरुंग प्रशासन आणि पोलीस दलात मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. लवकरच कराड याला बीडच्या जिल्हा कारागृहातून थेट नाशिकच्या तुरुगांत पाठवलं जाणार आहे. कराडच्या जीवितास धोका असल्याची बाब लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

कराड गँगचा गिते गँगशी वाद

काही दिवसांपूर्वीआरोपी वालिमीक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहाऐवजी दुसऱ्या कारागृहात पाठवण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांसह देशमुख कुटुंबियांनी केली होती. बीडच्या जिल्हा कारागृहात गिते गँग आणि कराड गँगगमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. या सर्व बाबी लक्षात घेऊनच कराडला आता नाशिकच्या तुरुंगात हलवण्यात येणार आहे.संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे आणि महेश केदार हे आरोपी बीडच्या जिल्हा करागृहात आहेत.त्यापैकी वालिमीक कराडला आता नाशिकच्या जिल्हा कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाल्मिक कराडची ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल

दरम्यान, वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले होते. हत्या करणाऱ्या काही आरोपींचा संबंध थेट वाल्मिक कराडशी आहे, असे समोर आले होते. त्यानंतर कराडला या प्रकरणातील मुख्य आरोपी करण्यात आले होते. हे प्रकरण मागे पडलेले असतानाच आता कराडचीच एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये कराड कथितपणे धमकावताना दिसतोय.