दहावी, बारावीच्या मुलांसाठी चांगली बातमी, यंदापासून बोर्डाने केला असा बदल

| Updated on: Jan 30, 2024 | 8:14 AM

SSC and HSC Exam | दहावी, बारावीची परीक्षा पुढील महिन्यापासून सुरु होणार आहे. परीक्षेपूर्वी राज्य शिक्षण मंडळाने महत्वाचा बदल केला आहे. या बदलाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. विद्यार्थ्यांचे गुण वाढणार आहे.

दहावी, बारावीच्या मुलांसाठी चांगली बातमी, यंदापासून बोर्डाने केला असा बदल
Follow us on

पुणे, दि.25 जानेवारी 2024 | दहावी, बारावीच्या परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी चांगली बातमी आहे. राज्य शिक्षण मंडळाने विद्यार्थी हितासाठी निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यंदा फेब्रुवारी – मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेपासूनच होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणात वाढ शक्य होणार आहे. बोर्डाने मुलांना यंदापासून दहा मिनिटे जादा वेळ देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ११ वाजता सुरु होणारा पेपर २ ऐवजी २.१० वाजता संपणार आहे. तसेच यंदापासून केंद्रीय शिक्षण मंडळानेही (सीबीएसई) महत्वाचा बदल केला आहे.

बोर्डाकडून बदलाची माहिती

विद्यार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी, प्रश्‍नांचे आकलन होण्यासाठी हा वेळ मिळणार आहे. यापूर्वी हा वेळ दिला जात होता. त्यावेळी हा वेळ परीक्षा सुरु होण्याआधी दिला जात होता. परंतु प्रश्‍नपत्रिका मोबाईलवर व्‍हायरल होण्याच्‍या घटना घडल्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता हा वेळ सुरुवातीऐवजी नंतर दिला जाणार आहे. यामुळे प्रश्नपत्रिका व्हायरल होणार नाही आणि विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून यासंदर्भात वारंवार मागणी झाल्यानंतर दहा मिनिटांचा वेळ वाढवून दिला आहे, राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी याबाबत माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर यावे. सकाळच्या सत्राची परीक्षा ११ वाजता सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर दाखल व्हावे. दुपारच्या सत्रात ३ ऐवजी २.३० वाजता यावे लागणार आहे, असे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सीबीएसईसाठी असा बदल

सीबीएसई परीक्षेसाठी यंदा महत्वाचा बदल केला आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी दिली जाणार नाही. तसेच त्यांना श्रेणीसुद्धा दिली जाणार नाही. यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था गुण किंवा श्रेणी काढणार आहे. तसेच नोकरीसाठी गुणांची टक्केवारी आवश्यक असल्यास संबंधिक कंपनी यासंदर्भात विषयांवरुन निर्णय घेऊ शकेल. ती कंपनी गुणांची बेरीज करुन टक्केवारी काढेल.