सिंधुदुर्गमध्ये एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

सिंधुदुर्गमध्ये एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण थोडक्यात बचावला आहे.

सिंधुदुर्गमध्ये एसटी बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 20, 2025 | 8:47 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे, रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक जण जखमी झाला आहे. या रिक्षातून प्रवास करणारे मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर येत आहे. रिक्षा समोरून येणाऱ्या बसला धडकल्यानं हा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा चुराडा झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बस आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात देवगड तालुक्यातील नारिंग्र येथे घडला. बस आणि रिक्षा यांच्यात समोरा समोर जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण थोडक्यात बचावला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विजयदुर्ग मालवण एसटी बस नारिंगरे येथे आली असता, समोरून येणारी रिक्षा बसला धडकली. या रिक्षामधील व्यक्ती मद्यधुंद अवस्थेमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.  या अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला आहे. अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाल्याची महिती समोर आली आहे.

चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात 

विजयदुर्ग मालवण ही एसटी बस नारिंगरे येथे आली असताना समोरू येणारी भरधाव रिक्षा या बसला धडकली. समोरा-समोर हा अपघात झाला. या अपघातामध्ये रिक्षाचा चुराडा झाला आहे. या रिक्षामधील व्यक्ती हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचं बोललं जात आहे. रिक्षा चालकाचं रिक्षावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात चार प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे.

कल्याणमध्येही अपघात 

दरम्यान दुसरीकडे कल्याण -पुणे लिंक रोड वर देखील एक अपघात घडला आहे. डंपरच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे.  विजय नगर परिसरात डंपरला ओव्हरटेक करताना दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सिलिंडरच्या गाडीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडला.