ST Strike Update | एसटी कर्मचारी कामावर, पुढील पंधरा दिवसात सुविधा पूर्वपदावर, मराठवाड्यात काय स्थिती?

| Updated on: Apr 20, 2022 | 11:30 AM

औरंगाबाद : सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटीची (ST Strike) सेवा पूर्वपदावर येतेय. येत्या 22 एप्रिलपर्यंत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोमवारपासूनच मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी (ST Employees) कामावर रूजू होत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांतील जवळपास 80 टक्के कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. यात चालक […]

ST Strike Update | एसटी कर्मचारी कामावर, पुढील पंधरा दिवसात सुविधा पूर्वपदावर, मराठवाड्यात काय स्थिती?
सांकेतिक छायाचित्र
Image Credit source: tv9
Follow us on

औरंगाबाद : सहा महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटीची (ST Strike) सेवा पूर्वपदावर येतेय. येत्या 22 एप्रिलपर्यंत आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत येण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सोमवारपासूनच मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी (ST Employees) कामावर रूजू होत आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली आदी जिल्ह्यांतील जवळपास 80 टक्के कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. यात चालक आणि वाहनकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मात्र अनेक महिन्यांपासून एसटी बंद असल्यामुळे त्यांच्या मेंटेनन्सचे काम सुरु आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये (Maharashtra Government) विलीनीकरण व्हावे, या मागणीसाठी दिवाळीच्या आधीपासून संपावर गेले होते. त्यामुळे मागील सहा महिन्यापासून राज्यभरातील नागरिकांच्या प्रवासाचे हाल झाले. अत्यावश्यक सेवेवर परिणाम झाल्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांविरोधात मेस्माची कारवाई केली होती. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे आदेश मागे घेण्यात आले आणि कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल पर्यंत कामावर रूजू होण्याचे आदेश देण्यात आले.

औरंगाबाद एसटी विभागात काय स्थिती?

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर औरंगाबाद डेपोतील बहुतांश कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. 90 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. मात्र हा संप पाच महिने चालल्याने अनेक गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे तांत्रिक बिघाड या गाड्यांना मध्ये झाल्याने त्यांच्या दुरुस्ती आणि मेंटन्स करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे आणखी किमान पंधरा ते वीस दिवस पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरू होण्यास लागतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नांदेड डेपोत काय स्थिती?

एकूण कर्मचारी- 2902
कामावर हजर – 1909
गैरहजर- 18
पूर्व परवानगी ने रजेवर- 551
प्रत्यक्ष संपावर – 424
जिल्ह्यातील 550 पैकी 200 बसेस द्वारे कालपासून वाहतूक सुरू झाली आहे.

परभणी डेपोचे अपडेट काय?

परभणी जिल्ह्यात एसटीचे कर्मचारी मोठ्यासंख्येने कामावर हजर झाल्याने येणाऱ्या दिवसात बसच्या फेऱ्या मोठ्या संख्येने वाढवण्यात येणार आहे . परभणी आगारात एकूण 2135 पैकी 1295 कर्मचारी कामावर हजर झालेत . तर आजही 840 कर्मचारी संपावर ठाम आहेत . कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने परभणी विभागात एसटी सेवेत बऱ्याचपैकी सुरधारण झाली आहे.

जालन्यात काय स्थिती?

जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, आणि जाफराबाद या 4 आगाररमधील 926 चालक आणि वाहकांपैकी 792 कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. 134 संपकरी आजी किंवा कामावर रुजू होतील अशी माही एस.टी. विभागीय नियंत्रक यांनी दिली आहे.

इतर बातम्या-

ST employees: लाल परी मैदान खड़ी, नाशिक विभागात 3738, तर जळगाव विभागातही 70 टक्के कर्मचारी रुजू, पण काम मिळेना

Jobs : इच्छा असेल तर थेट मुलाखतीला जायचं ! 17 जागांसाठी भरती प्रक्रिया, सविस्तर माहिती एका क्लिकवर