AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. माणसाने आयुष्यात यशस्वी होण्यासाठी काय केलं पाहिजे? आणि काय करू नये? याबद्दल चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहेत.

Chanakya Niti : प्रार्थना केल्यानं नाही तर मेहनतीमुळे मिळतं यश, यशस्वी व्हायचंय? मग या गोष्टींपासून दूरच रहा
Chanakya Niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 11, 2026 | 8:53 PM
Share

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य तीनी नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायच असेल तर त्याने काय केलं पाहिजे? आणि काय करु नये? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य यांचे हे विचार आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये म्हणतात की आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जो माणूस आळशी असतो तो आपल्या आयुष्यात काहीही करू शकत नाही. यश तर अशा लोकांसाठी फार दूरची गोष्ट असते. त्यामुळे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी आळस झटकून टाका आणि मेहनत करा. मेहनत ही एकमेव अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला यशाच्या द्वारापर्यंत घेऊन जाते. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर कठोर मेहनतीला पर्याय नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. पुढे चाणक्य असं देखील म्हणतात की तुम्ही जर नुसतीच मेहनत करत असाल तर त्याला देखील काही अर्थ नाही, कारण यशस्वी होण्यासाठी योग्य दिशेनं मेहनत, कष्ट करणं गरजेचं आहे. तुमच्या कामामध्ये सातत्य हवं, तर आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान अशा देखील काही गोष्टी आहेत, जर तुम्हाला यशस्वी व्हायच असेल तर या गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संगत – चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाहीच. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये आहात? जर तुम्ही वाईट लोकांच्या संगतीमध्ये असाल तर तुम्ही आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. तुमचा एखादा कितीही जवळचा मित्र असू द्या, मात्र तो जर वाईट संगतीच्या आहारी गेला असेल तर अशा व्यक्तीपासून अंतर ठेवणं हेच तुमच्यासाठी हिताचं आहे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

व्यसन – चाणक्य म्हणतात व्यसन हा तुमच्या यशाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे व्यसन, जर तुम्हाला एखाद्या वाईट गोष्टीचं व्यसन लागलं जसं की दारू, जुगार या सारख्या गोष्टींमुळे तुम्ही कंगाल व्हाल. जो व्यक्ती व्यसनाच्या आहारी जातो, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

राग – चाणक्य म्हणतात जे व्यक्ती रागीट स्वभावाचे असतात, ते आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत, कारण अशा लोकांपासून चांगली लोक दुरावली जातात. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी तुमच्या डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना