AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी रात्री झोपू शकत नाही, कपड्यांवर बोलत असाल तर धोतर नेसा; रिया भडकली

आंदोलनानंतर ट्रोलिंग आणि धमक्यांना सामोरी गेलेल्या रिया अहिरने तिच्या कपड्यांवरील टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "माझ्या कपड्यांवर बोलण्याआधी ३० दिवस धोतर नेसा!" असे सुनावत, तिने महिलांच्या जगण्याच्या हक्कावर आणि स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सायबर तक्रार दाखल करत ट्रोलर्सनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

मी रात्री झोपू शकत नाही, कपड्यांवर बोलत असाल तर धोतर नेसा; रिया भडकली
Riya AhirImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 6:16 PM
Share

मुंबईत तरुणांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया अहिर प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. सोशल मीडियातून रियाच्या या धाडसाचं कौतुक होत आहे. तसंच तिच्यावर टीकाही होत आहे. तिला ट्रोल केलं जात आहे. तिला धमकावल्याही जात आहे. या पार्श्वभूमीवर रियाने आज ट्रोलर्सला चांगलंच झापलं आहे. मला प्रचंड ट्रोल केलं जात आहे. मी रात्री झोपूही शकत नाही, असं रियाने म्हटलं आहे.

रिया अहिरने मीडियाशी संवाद साधला. यावेळी तिने गेल्या तीन दिवसापासून तिला येत असलेला अनुभव विशद केला आहे. हा अनुभव अत्यंत दाहक असल्याचं तिच्या बोलण्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे. माझ्यासोबत चुकीचं होत आहे, त्याविरोधात मी आवाज उठवत आहे. मी रात्री झोपू शकत नाहीये. सतत विचार सुरू असतात. जे मला बोलत आहेत त्यांनी स्वतःला आरशात पाहावं. माझ्या कपड्यांवर बोलत असाल तर स्वतः 30 दिवस धोतर नेसा. मग बोला, असा हल्लाच रियाने टीकाकारांवर चढवला आहे.

जगण्याचा हक्क नाहीये का?

आमच्याकडे काही फंडिंग नाही. पण माझ्याकडे थोडी मीडिया आहे. माझा देश बदल आहे. आम्ही सीजेपी आहोत. चिल्लर जनता पार्टी आहोत. ही चिल्लर पडते तेव्हा देशात आवाज उठतो. आंदोलन करणारी मुलं तुम्हाला आतंकवादी वाटतात?, असा सवाल तिने केला. मी सकाळी 10 वाजेपासून रात्री 7 वाजेपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी होते. मला जगायचा हक्क नाहीये का? मला शिव्या दिल्या जात आहेत? मुलींनी शिकलं पाहिजे की नाही हे मला समजत नाहीये? की मुलींनी फक्त पडद्याआड राहावं? असा संतप्त सवालही तिने केला.

जाहीर माफी मागा

मी सायबरमध्ये तक्रार केली. काही मुली माझे फोटो पोस्ट करत आहे. त्या मुलींना पण शिव्या दिल्या जात आहेत. मुलींबाबत काहीही बोलणाऱ्यांविरोधात ही केस आता आदर्श बनवणार आहे. ज्यांच्या विरोधात केस दाखल केली. त्यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करतानाच माझ्या विरोधात पण गुन्हा दाखल केला आहे, असं तिने सांगितलं.

कंगनाने…

यावेळी तिने अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावतवरही भाष्य केलं. बॉलिवूडमधील माफियांविरोधात ती लढली. आता ती मुलांच्या विरोधात बोलत आहे, याचं मला वाईट वाटतंय. तिने शिक्षण माफियांविरोधात लढायला हवं होतं. पण त्यांनी तसं केलं नाही, असं तिने सांगितलं. इंग्लिश लिटरेचरसाठी मी प्रवेश घेतला. मी फॉर्म भरला. पण मला अजून युनिव्हर्सिटीने बोलवलं नाही. शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे, असंही ती म्हणाली.

Follow Us
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान