VIDEO : Tik Tok व्हिडीओचा नाद नडला, बाईकवर स्टंट करताना तोंडावर पडला

मोटार सायकलवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. Tik Tok व्हिडीओ काढण्याच्या नादात एका स्टंटबाज तरुणांची बाईक त्याच्या अंगावर पलटली.

tik tok video, VIDEO : Tik Tok व्हिडीओचा नाद नडला, बाईकवर स्टंट करताना तोंडावर पडला

ठाणे : मोटार सायकलवर स्टंटबाजी करणे एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. Tik Tok व्हिडीओ काढण्याच्या नादात एका स्टंटबाज तरुणांची बाईक त्याच्या अंगावर पलटली. यामुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ठाण्यातील मुरबाडमध्ये ही घटना घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्टंटबाजी करतानाचे Tik Tok व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहे. नुकतंच मुरबाडमधील डॅम रस्त्यावर एका तरुणाचा मोटार सायकलवर स्टंटबाजी करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण रस्त्यावर बाईक चालवत आहे. बाईक एका चाकावर चालवण्याचा प्रयत्नात असताना त्या तरुणाची गाडी पलटी झाली. बाईक चालवताना त्याने हेल्मेटही वापरले नव्हते. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

हा सर्व प्रकार त्याच्या मित्राच्या मोबाईलमध्ये शूट झाला. या घटनेनंतर त्यांच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. विशेष म्हणजे हा प्रकार घरी समजू नये यासाठी त्याच्या मित्रांनी त्या मुलाच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही. पण हा सर्व प्रकार एका मित्राच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *