मोठी बातमी! सुधीर तांबे यांनी केली कॉंग्रेसची अडचण, एबी फॉर्म मिळून उमेदवारी न करता मुलाला दिली संधी, तांबे यांची राजकीय खेळी काय?

| Updated on: Jan 12, 2023 | 3:56 PM

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची फिक्सिंग झाली की काय अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे, उशिरा पर्यन्त भाजपने नाशिकचा उमेदवार न देणे, कॉंग्रेसची उमेदवार सुधीर तांबे यांनी नाकारणे आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करणे ही मोठी राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मोठी बातमी! सुधीर तांबे यांनी केली कॉंग्रेसची अडचण, एबी फॉर्म मिळून उमेदवारी न करता मुलाला दिली संधी, तांबे यांची राजकीय खेळी काय?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिकमधील पदवीधर मतदार संघात शेवटच्या काही तासांत मोठ्या घडामोडी घडल्या आहे. या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट आला आहे. सुधीर तांबे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेली असतांना सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामध्ये सुधीर तांबे यांनी मात्र आपल्या मुलाला म्हणजेच सत्यजित तांबे यांना कॉंग्रेस कडून एबी फॉर्म मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचे स्वतः सुधीर तांबे यांनी सांगितले. तर दुसरीकडे तीन वाजेपर्यन्त भाजपने आपला उमेदवार कोण असेल ही देखील सांगितले नाही. त्यामुळे नाशिकच्या विभागीय कार्यालयात मोठा सस्पेन्स बघायला मिळाला. तर दुसरीकडे भाजपने देखील सत्यजित तांबे यांना उमेदवारी देऊ केल्याची चर्चा होती. राज्यातील इतर चार ठिकाणचे भाजपने सर्व चित्र स्पष्ट केलेले असतांना नाशिकबाबत सस्पेन्स कायम ठेवला होता. त्यामुळे तांबे कुटुंबाने मोठी राजकीय खेळी खेळल्याचे बोलले जात असून त्यात कॉंग्रेसला न दुखावता आणि भाजपलाही नाराज न करता सत्यजित तांबे विजयी उमेदवार असण्याची परिस्थिती आत्ताच निर्माण झाली आहे.

नाशिकमध्ये सलग तीन वेळा पदवीधर मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुधीर तांबे यांना कॉंग्रेसने उमेदवारी जाहीर करून त्यांनी मुलाचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीतून माघार घेतली आहे.

यावेळी माध्यमांशी बोलत असतांना सुधीर तांबे म्हणाले, कॉंग्रेस पक्षाकडून मी तीन वेळा मी निवडून आलो आहे, विधान परिषदेसाठी हा वेगळा मतदारसंघ आहे. शिक्षक, पदवीधर, डॉक्टर यांचे प्रतिनिधित्व मी केलं

हे सुद्धा वाचा

पेन्शन, शिक्षक आणि डॉक्टर यांचे प्रश्न मी कायम हाताळले, शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात नवनवीन बदल होत आहे. सत्यजित तांबे यांना कॉंग्रेस कडून एबी फॉर्म मिळाला नाही पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

युवा नेतृत्व आहे, तरुणांना संधी देण्याचे कॉंग्रेसने नेहमीच केले आहे. त्यामुळे माझ्या ऐवजी सत्यजित तांबे हे उमेदवार असतील. भाजपकडून मला ऑफर नव्हती आणि त्यांचा पक्षही मोठा आहे.

तर यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सत्यजित तांबे यांनीही संयम राखून प्रतिक्रिया दिली आहे, यामध्ये त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांनीही मला पाठिंबा द्यावा यासाठी विनंती करणार असल्याचे म्हंटले आहे.

यावेळी सत्यजित तांबे म्हणाले, आम्ही कॉंग्रेस पक्षाकडे मागणी केली होती, कॉंग्रेस मधून मला उमेदवारी देण्याची त्यांची इच्छा होती, शेवटच्या क्षणी मला कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून अपक्ष अर्ज भरला असला

कॉंग्रेसचा एबी फॉर्म मला भेटला नाही, पण भारतीय जनता पार्टीसह मला सर्वांच पक्षांचा पाठिंबा हवा आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन मला मदत करावी, 22 वर्षीय मी संघटनेत काम केले आहे, विधान परिषद हा प्रश्न मांडण्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे.

एकूणच नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची फिक्सिंग झाली की काय अशी स्थिती याठिकाणी निर्माण झाली आहे, उशिरा पर्यन्त भाजपने नाशिकचा उमेदवार न देणे, कॉंग्रेसची उमेदवार सुधीर तांबे यांनी नाकारणे आणि सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी करणे ही मोठी राजकीय खेळी खेळल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.