AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचा तडकाफडकी शरद पवार यांना फोन, राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार शरद पवार यांना फोनकॉल केला आहे. एकीकडे राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. असे असताना आता दुसरीकडे या फोनकॉलमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

सुनेत्रा पवार यांचा तडकाफडकी शरद पवार यांना फोन, राजकारणात मोठी खळबळ; नेमकं काय घडतंय?
sunetra pawar and sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 04, 2026 | 3:24 PM
Share

Sunetra Pawar Calls Sharad Pawar : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे. परंतु यावेळी महायुती आणि माहविकास आघाडीमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी वरिष्ठांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत आहे. विशेष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीतील अनेक नेत बंडखोरांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये काही जागांवर यशही आले आहे. महायुतीला रायगड, ठाणे येथील निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले आहे. दरम्यान, आता एकीकडे विधानपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना आता दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी खासदार शरद पवार यांना तडकाफडकी फोन कॉल केला आहे.

सुनेत्रा पवार यांनी फोन कॉल का केला?

पुणे विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक ही आता बिनविरोध झाली आहे. कारण शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी स्वत: शरद पवार यांनी श्रीकांत पाटील यांना फोन कॉल केला. श्रीकांत पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्यांनी थेट शरद पवार यांना फोन कॉलद्वारे आपण आपल्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्यावा, अशी मागणी केली. या फोन कॉलनंतर शरद पवार यांनीच श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आदेश दिला. श्रीकांत पाटील यांनी वरिष्ठांच्या आदेशानंतर या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे आता पुण्याची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे.

काकडे यांचाही फोन कॉल

पुण्याच्या जागेसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही भरला होता. श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता होती. हीच शक्यता टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना फोन कॉल केला. काकडे यांनीदेखील शरद पवार यांच्याकडे अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली होती.

Follow Us
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप
सरकारी कार्यालय की Reel शूटिंगचं ठिकाण? रिसोडच्या तहसीलदारांवर नियमभंगाचा आरोप, नेमकं काय घडलं?