Sunil Tatkare : शरद पवार NDA मध्ये येण्याची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला काय वाटतं? चांगलं की वाईट

Sunil Tatkare : खरंतर तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. दोन गट तयार झाले. त्यानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल या दोन नेत्यांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा रोष होता. त्यांच्यावर सतत टीकाटिप्पणी सुरु असायची.

Sunil Tatkare : शरद पवार NDA मध्ये येण्याची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला काय वाटतं? चांगलं की वाईट
Sharad Pawar
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 08, 2026 | 10:32 AM

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पहायला मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होईल अशा बातम्या येत आहेत. पवारांच्या पक्षाने याची चाचपणी सुद्धा सुरु केल्याचं बोललं जातय. खरंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सत्ताधारी बाकावर बसण्यावरुनच दोन मतप्रवाह आहेत. एकगट सत्तेत जाण्यासाठी अनुकूल आहे, दुसरा गट विरोधी बाकावर बसायचं या मताचा आहे. नुकतीच मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट झाली होती. या भेटीत एनडीएसोबत गेल्यास पदरात काय पडेल या विषयी चाचपणी करण्यात आली.

दरम्यान शरद पवारांनी पक्षातील सर्व आमदार, खासदारांसोबत बोलण्याची जबाबदारी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका वरिष्ठ नेत्यावर सोपवल्याची चर्चा आहे. त्या शिवाय भाजपसोबत वरिष्ठ पातळीवर बोलणी करण्याची जबाबदारी सुद्धा एका नेत्यावर दिल्याची माहिती आहे. या दोन गोष्टी खूप सूचक संकेत देत आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विधानसभेत 10 आमदार आहेत, लोकसभेत 8 खासदार आहेत. त्यांची लोकसभेतली ताकद भाजपसाठी महत्वाची आहे.

सुनील तटकरे, पवार एनडीएमध्ये येणार यावर काय म्हणाले?

दरम्यान शरद पवार एनडीएमध्ये येणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुनेत्रा पवार यांचा गट अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस मानला जातो. “सहा दशकाच्या राजकीय अनुभवाच्या बळावर शरद पवार योग्य निर्णय घेतील” असं सुनील तटकरे म्हणाले. “एनडीएला पाठिंबा देण्याचा अंतिम निर्णय शरद पवारचं घेतील. मला या विषयावर काही माहित नाही. पण पवार साहेबांनी सहा दशकात देशाच्या राजकारणात स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि विकासाभिमुख नेतृत्व आहे. ते योग्य निर्णय घेतील” असं सुनील तटकरे म्हणाले.

त्यानंतर तटकरेंना लक्ष्य करण्याचं प्रमाण कमी झालं

मध्यंतरी राष्ट्रवादीत काही गोष्टींवरुन बिनसल्यानंतर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीकडून तटकरेंना लक्ष्य करण्याचं प्रमाण थोडं कमी झालं.

सचिन अहिर सिलव्हर ओकवर

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेणारे आमदार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर आशिर्वाद घेण्यासाठी सिलव्हर ओकवर आले आहेत. सचिन अहिर यांच्या राजकीय जडणघडणीत शरद पवार यांचं खूप मोठं योगदान आहे. शरद पवारांनीच सचिन अहिर यांना मंत्री बनवलं, मुंबई शहराध्यक्ष केलं. आज अहिर त्यांचे आशिर्वाद घेण्यासाठी सिलव्हर ओकवर पोहोचले आहेत.

Follow Us