AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही ‘वर्षा’चे उंबरठे झिजवत होतात, ते सगळं मला.., तटकरेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रवादीमध्ये छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी द्यावी, अशी सूचना रोहित पवार यांनी केली होती. यावरून सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. रोहित पवार यांचा सल्ला घेण्याची वेळ अजून आलेली नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून तुम्ही 'वर्षा'चे उंबरठे झिजवत होतात, ते सगळं मला.., तटकरेंचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल
सुनील तटकरे यांचा रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 3:08 PM
Share

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान सभेचं सदस्यत्व मिळाल्यानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता, सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याची ही जागा सध्या रिक्त आहे. दरम्यान या जागेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांची वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील छगन भुजबळ यांनाच राज्यसभेचे खासदार करावे, असा सल्ला दिला होता, यावरून आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी, या रोहित पवारांच्या सूचनेवर प्रतिक्रिया देताना “आमच्या पक्षात उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी रोहित पवारांचा सल्ला घेण्याची वेळ अजून आलेली नाही.” असा टोला तटकरे यांनी लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले तटकरे? 

“आमच्या पक्षात उमेदवारी कोणाला द्यायची यासाठी रोहित पवारांचा सल्ला घेण्याची वेळ अजून आलेली नाही.” असा जोरदार टोला तटकरे यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. रोहित पवारांनी त्यांच्या पक्षात सल्ले द्यावेत आणि पक्षाचे संख्याबळ कसे वाढेल यावर अधिक लक्ष केंद्रित करावे, असा सल्लाही यावेळी तटकरे यांनी रोहित पवार यांना  दिला आहे.

मुळात कोण सल्ला देतंय, त्यांचा सल्ला देण्याचा काय अधिकार? मला एक कळत नाही अजितदादा यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर तेच विलिनीकरणाची चर्चा करत होते. त्यावेळी आम्ही एनडीए थोडीच सोडणार होतो. आम्ही एनडीसोबत म्हणजे भाजपसोबतच राहणार होतो. त्यावेळी देखील ते सुईनुसार बोलत होते. त्यामुळे आम्हाला त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. तुमचे सहकारी टिकवा, तुमचं स्वत:चा अस्तित्व टिकवा. कारण तुम्हीच एकेकाळी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी हडपसरमधून मिळावी म्हणून कोणाला घेऊन वर्षा बंगल्याचे उंबरठे झिजवत होतात? त्याची स्वातंत्र्य माहिती माझ्याकडे आहे, असंही यावेळी बोलताना तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान राष्ट्रवादीकडून नवनीत राणा यांना देखील राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते, अशी देखील चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेला तटकरे यांनी पूर्वविराम लावला आहे.  नवनीत राणा यांच्या नावाचा विषय पक्षाकडून संपलेला असल्याचं यावेळी तटकरे यांनी म्हटलं.  दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यसभा उमेदवारीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात