कॅप्टन खरात प्रकरणी सुषमा अंधारेंचे खळबळजनक दावे, रुपाली चाकणकरांचा फोटो अपलोड केल्याने खळबळ!

नाशिक येथील प्रसिद्ध ज्योतिषी अशोक खरात याला एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्याच्या कार्यालयातून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत.

कॅप्टन खरात प्रकरणी सुषमा अंधारेंचे खळबळजनक दावे, रुपाली चाकणकरांचा फोटो अपलोड केल्याने खळबळ!
Sushma andhare
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 18, 2026 | 5:46 PM

नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँचने मंगळवारी मध्यरात्री किंवा बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले. हा प्रकार नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयातून उघडकीस आला आहे. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा फोटो शेअर करत टीका केली आहे.

काय आहे सुषमा अंधारे यांची पोस्ट?

सुषमा अंधारे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर करत, “रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली… कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत” असे म्हटले.

पुढे त्या म्हणाल्या की, “विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष; खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत…! योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…? ”

प्रकरण नेमकं काय?

एक ३५ वर्षीय महिलेने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, खरात याने धार्मिक विधी, मंत्र-तंत्र किंवा गुंगीचे औषध (डर्टी वॉटर/गुंगीकरक पाणी) देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या तक्रारीवरून बलात्कार आणि संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान खरातच्या कार्यालयातून एक पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आली, ज्यात ५८ आक्षेपार्ह व्हिडीओ आढळले आहेत. पोलिस सूत्रांच्या मते, या व्हिडीओमध्ये अनेक महिलांचे, तसेच काही राजकीय नेते, मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि सेलिब्रिटींच्या संबंधित सामग्री असण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली असून, मोठ्या व्यक्तींच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us