
राज्यात गेल्या काही दिवसांपासून फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. मूळची बीडची असलेली ही महिला डॉक्टर फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयात दोन वर्षांपासून काम करत होती. तिच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळे वळण येत आहे. अनेकजण ही आत्महत्या नसून हत्या आहे असे म्हणत आहे. या प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी वेगवेगगळे खुलासे केले. त्यांनी पोस्टमॉर्टनवेळी झालेल्या चुका सांगितल्या आहेत.
सुषमा अंधारे यांनी पोस्टमॉर्टनमधल्या चुका अधोरेखीत करत म्हटले की, शवविच्छेदन अहवालामध्ये काही उणीव होती याबाबत प्रश्न उपस्थित केलेले आहेत. शवविच्छेदनासाठी भावाला उपस्थित राहु दिलं नाही. इनकॅमेरा शवविच्छेदन केलं गेलं पाहिजे अशी मागणी होती. ऊसतोड मजुरांवर 2-2 मिनिटाला FIR झाले. पण हा 8 तास FIR नोंदवायला वेळ लागतो.. संशयास्पद पध्दतीने या गोष्टी केल्या गेल्या.
पुढे त्या म्हणाल्या, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी दुरध्वनी वरुन संवाद साधला. आम्ही उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्यामुळे विश्वास ठेवू. महिला आयोगावर कारवाई करू असा शब्द अजितदादांनी दिला. उद्धव ठाकरेंनी कुटुंबीयांशी संवाद साधला.. कायदेशीर बारकावे समजून घेतले. 2 तारखेपर्यंत अल्टीमेटम आहे. 3 तारखेला पोलीस स्टेशन समोर बसू. कुटुंबाने वकील दिलेला असेल तरी सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करणारे वकील उपलब्ध करून देण्याचा शब्द ठाकरे साहेबांनी कुटुंबाला दिलेला आहे. ऊसतोड कामगाराचं हे लेकरू कर्तृत्ववान होतं. लाज सरकार आणि व्यवस्थेला वाटली पाहिजे. नुसती नाराजी व्यक्त करून उपयोग नाही. फक्त नाराजी व्यक्त करून उपयोग नाही. तटकरे पद कायम ठेवणार असतील तर.. कायदेशीर बाबीत गरीमा आणणारी व्यक्ती पदावर नसावी. दादा बीडचे पालकमंत्री आहेत आणि बारामती लोकसभेत फलटण येतं. यामुळे अजित दादांची सबब देही जास्त आहे.
उद्धव साहेबांनी कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी कुटुंबासोबत असल्याचं सांगितलं. संपूर्ण प्रकरण समजून घेतलं कायदेशीर बाबी जाणून घेतल्या. आम्ही रस्त्यावरची ही लढाई लढणार आणि न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार. अजित दादांनी सुद्धा कुटुंबाशी संवाद साधला त्यांनी कुटुंबाला शब्द दिला आहे त्यामुळे आम्ही विश्वास ठेवतो. महिला आयोगाच्या संदर्भात देखील कारवाई करू असा शब्द अजित दादांनी दिला आहे. दोन तारखेपर्यंत आम्ही सरकारला अल्टीमेटम देतो तीन तारखेला आम्ही फलटण पोलीस ठाण्यासमोर जाऊन बसणार आहोत. एफ आय आर नोंदवायला आठ तास लागले. ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होणं बाकी आहे असे सुषमा अंधारे म्हणाल्या.