एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत बोलणं म्हणजे…, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं

माफ करा पण, शब्द वापरतो, मुर्खांचा बाजार आहे. कशाकरिता राजीनामा देतील. यापेक्षा जास्त मी बोलू शकणार नाही.

एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याबाबत बोलणं म्हणजे..., देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं
Govinda Hatwar | Updated on: May 10, 2023 | 8:04 PM

संतोष जाधव, प्रतिनिधी,  लातूर : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल उद्या येईल. या निकालाची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दलचा निकाल उद्या ११ वाजता थेट दाखवला जाणार आहे. सुमारे वीस मिनिटं हा निकाल वाचन्यासाठी लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं. निकालाच्या आधी एकनाथ शिंदे उद्या राजीनामा देतील, असं विरोधक बोलतात. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माफ करा पण, शब्द वापरतो, मुर्खांचा बाजार आहे. यापेक्षा जास्त कशाकरिता राजीनामा देतील. मी बोलू शकणार नाही.

शिंदे हे राजीनामा देणार नाहीत

एकनाथ शिंदे राजीनामा कशाकरिता देतील? त्यांनी काय चूक केली आहे. एकनाथ शिंदे हे राजीनामा देणार नाहीत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. मी तुम्हाला दाव्याने सांगतो की, पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढू, असं देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.

शिंदे म्हणतात, आधी निर्णय येऊ द्या

सत्तासंघर्षावरील निकाल लागल्यावर प्रतिक्रिया देणार, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं. आधी निर्णय येऊ द्या. नंतर मी बोलतो, असं शिंदे यांनी म्हंटलं. एकनाथ शिंदे हे आता निकालानंतर प्रतिक्रिया देणार आहेत.

उद्याचा निकाल पाहता येणार लाईव्ह

राज्यासाठी तसेच देशासाठी असा हा महत्त्वाचा निकाल राहणार आहे. उद्याचा हा निकाल कोर्टामधून लाईव्ह पाहता येणार आहे. या निर्णयाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

निकालाचे संपूर्ण देश पालन करेल

न्यायालय जो आदेश देईल, त्याचे संपूर्ण देश पालन करणार असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं. अध्यक्ष म्हणून मी जबाबदारीने काम करत आहे. सुनावणी आणि सर्व व्यवस्थित पार पाडेल, असंही नार्वेकर यांनी सांगितलं.

उद्या होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार अपात्र झाल्यास काय होणार यासंदर्भात तर्क वितर्क लावले जात आहे. उद्याचा निकाल हा महत्त्वपूर्ण राहणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us