
महाराष्ट्रात महाराज, महंताना मानाचे स्थान आहे. आपले प्रवचन, कीर्तन, संदेशाच्या माध्यमातून ते समाजाला घडवण्याचे काम करतात. राज्यात असे काही महंत आहेत, ज्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भूतकाळात काही महंत वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आलेले आहेत. दरम्यान, सध्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक घटना समोर आली आहे. अहिल्यानगरातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री यांनी स्वत:वरच वार केले आहेत. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनी स्वत:वरच वार केल्याचे म्हटले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहेत. तसेच त्यांचे अनुयायीही हैराण आहेत. त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वत:वरच वार केले आहेत. यामध्ये ते स्वत: गंभीर जखमी झाले आहेत. महाराजांनी स्वत:वर नेमके का केले? याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु त्यांच्या अंगावर वार असल्याचे दिसताच त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अहिल्यानगरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे. पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात त्यांचा मोठा भक्त परिवार आहे.
या घटनेमुळे भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदारा मोनिका राजळे आणि भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डिले हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. महाराजांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार केले जात आहेत. आता त्यांनी स्वत:वर वार नेमके का केले? त्यांच्या कोणाशी वाद होता का? हे सर्व तपासाअंती समजू शकणार आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे की नाही? याची नेमकी माहिती समजू शकलेली नाही. परंतु समोर आलेले फोटो आणि व्हिडीओनुसार महंत आदिनाथ शास्त्री महाराज हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती सध्या कशी आहे, याची माहिती सध्यातरी डॉक्टरांनी दिलेली नाही.