‘तौत्के’चा तडाखा बसलेल्या सिंधुदुर्गवासियांना पहिली मदत, एकनाथ शिंदेंकडून 6 गाड्या सिमेंट पत्रे दाखल

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सावली देण्यासाठी 6 गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठवले आहेत.

'तौत्के'चा तडाखा बसलेल्या सिंधुदुर्गवासियांना पहिली मदत, एकनाथ शिंदेंकडून 6 गाड्या सिमेंट पत्रे दाखल
एकनाथ शिंदे यांच्याकडून सिंधुदुर्गवासियांना सिमेंट पत्र्यांची मदत
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 7:33 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात अनेकांच्या घरांचं मोठं नुकसान झालं. झाडांची पडझड होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. अशावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना सावली देण्यासाठी 6 गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठवले आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतून आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि मदत पोहचली आहे. आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ, कणकवली, सावंतवाडीमध्ये ह्या गाड्या रवाना केल्या. (Eknath Shinde donates cement sheets to cyclone victims)

शिवसेना नेहमीच संकट काळात नागरिकांना मदतकार्य करत असते. त्यानुसार शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्तांसाठी 6 गाड्या भरून सिमेंट पत्रे पाठविले आहेत. वादळामुळे नुकसान झालेल्या सिंधुदुर्गवासियांना जास्तीत जास्त मदत देण्याचे काम येत्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून केले जाणार असल्याचं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पत्रे घरांचं नुकसान झालेल्या सर्वांना दिले जाणार आहेत. संकटकाळी सर्वप्रथम शिवसेना पक्षच धावून येत असतो. या संकटातही हे सिद्ध झाले आहे. अशाच प्रकारे शिवसेना जनतेच्या संकटकाळात मदतकार्यासाठी तत्पर राहील असं संदेश पारकर म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा ठरला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वडेट्टीवार कोकणात

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा उद्या 20 मे रोजी कोकण दौऱ्यावर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. 20 ते 23 मेपर्यंत ते कोकणातील नुकसानीची पाहणी करणार आहेत. या तीन दिवसाच्या दौऱ्यात ते कोकणात झालेल्या नुकसानीची पाहणी करतानाच अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन नुकसानीचा आढावाही घेणार आहेत.

संबंधित बातम्या :

PHOTO : ‘तौत्के’च्या तडाख्यानंतर देवेंद्र फडणवीस कोकणात, नुकसानाचा आढावा घेत तातडीच्या मदतीची मागणी

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का? RTI मध्ये विचारणा, निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

Eknath Shinde donates cement sheets to cyclone victims

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.