देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का? RTI मध्ये विचारणा, निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट

देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. | Nilesh Rane CM Uddhav Thackeray

देवेंद्र फडणवीसांनी दौरे करण्यासाठी ई-पास काढलाय का? RTI मध्ये विचारणा, निलेश राणेंचं उद्धव ठाकरेंकडे बोट
निलेश राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 20, 2021 | 12:53 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता घराबाहेर पडतील तेव्हा ती ब्रेकिंग न्यूज ठरेल, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. उद्धव ठाकरे कधी घराच्याबाहेर पडणार, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी म्हटले. (BJP Leader Nilesh Rane slams CM Uddhav Thackeray)

कोपरगाव येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते संजय काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोकण दौऱ्यासंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले होते. कोकण दौऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ई-पास काढला आहे का, असा प्रश्न त्यांनी माहिती अधिकारातंर्गत विचारला होता. हाच धागा पकडत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला हाणण्याची संधी साधली.

देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्राचा दौरा करताना ई-पास काढलाय का असं माहितीच्या अधिकारात विचारण्यात आलं. तसंच उद्धव ठाकरे कधी ई-पास काढणार आहेत किंवा काढणार की नाही हे पण माहितीच्या अधिकारात विचारावं. उद्धव ठाकरे घराच्या बाहेर पडले, ही बातमी बघायला महाराष्ट्राची जनता थांबली आहे, असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता शिवसेनेकडून निलेश राणे यांच्या या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही’

सद्यपरिस्थितीत पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत, हे आता मोदींनाही पटलं असावं: संजय राऊत

(BJP Leader Nilesh Rane slams CM Uddhav Thackeray)

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.