नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल

आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता. | Sandeep Deshpande

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही; मनसेचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी

मुंबई: सद्यपरिस्थितीत पाहता महाराष्ट्रातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, असे वक्तव्य मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केले. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही, असा टोला त्यांनी लगावला. (MNS leader Sandeep Deshpande slams PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray)

संदीप देशपांडे यांनी कालदेखील मुंबईतील पत्रकारपरिषदेत नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रातही यावे. म्हणजे ते भारताचे पंतप्रधान आहेत, असे वाटेल. पंतप्रधान येऊन गेले तर उद्धव ठाकरेही महाराष्ट्रात फिरतील, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची फिरकी घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे. पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत, असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला होता.

संजय राऊत म्हणजे ‘सेक्रेड गेम्स’मधला तिवारी’; संदीप देशपांडेंचा हल्ला

संजय राऊत म्हणजे सेक्रेड गेम्स या वेबसिरीजमधील तिवारीच्या पात्राप्रमाणे आहेत. त्यांना ‘अहं ब्रह्मास्मि’चा भास होतो, ते त्याच थाटात वावरत असतात, असा टोला मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी लगावला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निदान मुंबईत तरी पाहणी करण्यासाठी बाहेर पडावे, अशी टीकाही देशपांडे यांनी केली होती.

‘महाविकासघाडीच्या नेत्यांनी सोडून इतरांनी काहीही केले तर ते राजकारण ठरते’

या पत्रकारपरिषदेत संदीप देशपांडे यांनी महाविकासघाडीच्या नेत्यांनाही टोला हाणला. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी काहीही केले तरी ते माफ असते. त्याशिवाय आणखी कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

गुजरातला एक हजार कोटींचं पॅकेज, वादळात दगावलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख; मोदींची मोठी घोषणा

उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत, हे आता मोदींनाही पटलं असावं: संजय राऊत

महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल

(MNS leader Sandeep Deshpande slams PM Narendra Modi and CM Uddhav Thackeray)

Published On - 9:49 am, Thu, 20 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI