महाराष्ट्रालाही ‘तौक्ते’चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल

तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालं आहे. (nawab malik slams pm narendra modi gujarat tour)

महाराष्ट्रालाही 'तौक्ते'चा फटका, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?; राष्ट्रवादीचा सवाल
नवाब मलिक

मुंबई: तौक्ते चक्रीवादळ ओसरल्यानंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोपाचं वादळ सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरातमध्ये आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही टीका केली आहे. महाराष्ट्रालाही तौक्ते वादळाचा फटका बसला, मग पंतप्रधानांचा भेदभाव का?, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. (nawab malik slams pm narendra modi gujarat tour)

नवाब मलिक यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुजरात दौऱ्यावर आक्षेप घेतला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या दीव-दमण आणि गुजरातचा हवाई दौरा करणार आहेत. महाराष्ट्रात तोक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत. महाराष्ट्राबाबतचा हा भेदभाव नाही का?, असा सवाल मलिक यांनी केला आहे.

महाराष्ट्रासाठी वेळ नाही

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे. तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा, गुजरातला जात आहेत. त्यांना तिकडे जायला वेळ आहे. पण महाराष्ट्रात येत नाहीत, अशी टीका करतानाच नियम शिथील करून कोकण किनारपट्टीवरील नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत देण्यात यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रातही वादळ आलं आहे. त्यामुळे मोदींनी महाराष्ट्रातही आलं पाहिजे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री ठाकरे सक्षम

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे सर्व संकटाशी सामना करण्यास सक्षम आहे. ते सक्षमपणे राज्य चालवत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे सक्षम आहेत, याची खात्री पंतप्रधानांनीही पटली असावी. म्हणून ते महाराष्ट्रात आले नाही. ज्या ठिकाणी कमकुवत सरकार आहे, त्या ठिकाणी मोदी गेले असावेत, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदींना लगावला आहे.

उद्धव ठाकरे शुक्रवारी कोकणात

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत हे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. मुख्यमंत्री उद्वव ठाकरे शुक्रवारी कोकणातील नुकसानीची पाहणी करतानाच ग्रामस्थांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते एक आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams pm narendra modi gujarat tour)

 

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ ठाकरेही कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा दौरा ठरला

फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर, तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी

उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत, हे आता मोदींनाही पटलं असावं: संजय राऊत

(nawab malik slams pm narendra modi gujarat tour)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI