इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ, नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीसीएस प्रकरणात नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?

इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ, नाशिक पोलिसांकडून गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?
imtiaz jaleel
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 06, 2026 | 8:44 AM

नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणी नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टीसीएस लैंगिक छळ धर्मांतर प्रकरणात लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणातून नव्या घडामोडी समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय दिला गेला होता. तिला एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी आत्तापर्यंत विशेष तपास पथकाने तीन वेळा चौकशी केली होती.  या प्रकरणाने माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता या प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलील यांच्या विरोधात पुरावे असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. एमआयएम नेते इम्तियाज जलील यांना पुढील चौकशीसाठी आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी हजर राहावे लागणार आहे. निदा खानला आश्रय दिल्या प्रकरणात इम्तियाज जलिल यांच्या सहभागाबद्दल एसआयटीने न्यायालयाला माहिती दिली.

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us