AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE: दिवसभरातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर

| Updated on: Nov 06, 2026 | 8:21 AM
Share

Maharashtra News LIVE: पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. या आणि राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या. 

Maharashtra News LIVE: दिवसभरातील प्रत्येक घडामोडींचे अपडेट्स मिळवा एका क्लिकवर
breaking news live today on 6 nov 2026

LIVE NEWS & UPDATES

  • 06 Nov 2026 08:21 AM (IST)

    जक्केकुरच्या शेतकऱ्यांचा नैसर्गिक शेतीचा प्रयोग!

    धाराशिव जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना उमरगा तालुक्यातील जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी शेतीतून उत्पन्नाचा नवा पर्याय शोधला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केवळ पारंपरिक पिकांवर अवलंबून न राहता ११ शेतकऱ्यांनी एकत्र येत तब्बल ११ एकर क्षेत्रावर नाचणी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. विशेष म्हणजे, नैसर्गिक पद्धतीने केलेल्या या नाचणी लागवडीतून एकरी सुमारे ६० हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच जनावरांसाठी हिरवा चाराही उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. दुष्काळाशी दोन हात करत जक्केकुरच्या शेतकऱ्यांनी नाचणीच्या माध्यमातून शेतीला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे.

  • 06 Nov 2026 08:21 AM (IST)

    दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता अधिकच

    दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता अधिकच वाढत असून सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे वेगवेगळ्या अंगान त्याचा फटका बसू लागलेला आहे, अंबड तालुक्यातल्या लोणार भायगाव येथील सुरेश दसपुते या शेतकऱ्याची पपईची बाग पाण्याअभावी वाळून जात आहे. जवळपास दोन एकर क्षेत्रावरील ही पपईची बाग त्यांनी लावली होती तळहाताच्या फोड्याप्रमाणे जपलेल्या फळबागा आपल्या डोळ्यादेखतच जळून जात असल्याने सध्या फळबाग उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आहे, दरम्यान येत्या काळात ही परिस्थिती यापेक्षाही बिकट होण्याची शक्यता असून उर्वरित फळबागा देखील नष्ट होण्याच्या मार्गावर आहे

  • 06 Nov 2026 08:20 AM (IST)

    जालन्याच्या लोणार भायगाव गावात टँकर द्वारे पाणी पुरवठा सुरु

    जालना जिल्ह्यामध्ये पाणीटंचाईचं संकट अधिकच गंभीर होत असताना प्रशासनाकडून अनेक गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे,अंबडच्या लोणार भायगाव या गावांमध्ये प्रशासनाकडून गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी टँकर सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुष्काळाची दाहकता अधिकच मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आसपास असलेले छोटे-मोठे जलस्रोत कोरडे ठाक पडल्याने मागच्या अनेक दिवसापासून या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे टँकर सुरू करण्याची मागणी केली होती, त्याची दखल प्रशासनाने गांभीर्याने घेतली आणि टँकर सुरू करून गावकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय..

  • 06 Nov 2026 08:17 AM (IST)

    नालासोपा-यात मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने जाणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन

    नालासोपा-यात मद्यधुंद अवस्थेत रस्त्याने जाणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन अश्लील वर्तन करणाऱ्या नराधमाला महिलेसह नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला आहे. चोप दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल नालासोपारा पूर्वे प्रगतीनगर येथील लिव्हिंग लिक्विड वाईन शॉपसमोरील मुख्य रस्त्यावर रात्री साडे नऊ च्या सुमारास ही घटना घडली आहे. भर वस्तीतील मुख्य रस्त्यावर महिलेशी अश्लील वर्तन झाल्याने नागरिकात तीव्र संताप व्यक्त होत असून, कायदा सुव्यवस्थे वरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • 06 Nov 2026 08:16 AM (IST)

    इम्तियाज जलिल याच्यावर गुन्हा दाखल

    TCS धर्मातर आणि लैगिक शोषण प्रकरणात Mim नेते इम्तियाज जलिल याच्यावर गुन्हा दाखल

गेल्या 61 तासांपासून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे. तर शनिवारी 7 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती, तो बंदही मागे घेण्यात आला. यामुळे मालवाहतूकदारांचा जीव भांड्यात पडला तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे आता पेटणार आहेत. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, गोकुळवरून सत्ताधाऱ्यांमध्येही वादाची ठिणगी पडल्याचा दावा करण्यात येत आहे.  गोकुळमध्ये शासननियुक्त चार संचालक नेमण्याचा निर्णयावरून वादळ उठलेले असतानाच महायुतीतही त्याचे तीव्र पडसाद उमटल्याचे समोर येत आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मोठी कारवाई केली आहे. दिवाळी सणानिमित्त होणारी भेसळ थांबविण्यासाठी भंडाऱ्यात FDA च्या अधिकाऱ्यांनी ६ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय स्थरावर एप्रिलनंतरच्या सर्वात मोठ्या साप्ताहिक घसरणीनंतर, शुक्रवारी ‘ब्रेंट क्रूड’ (Brent crude) पुन्हा एकदा १०० डॉलरच्या पातळीच्या दिशेने वाटचाल करत आहे. हे आणि राज्यासह देशभरात घडणाऱ्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर या ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Published On - Nov 06,2026 8:13 AM

Follow Us
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास...
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! यंदा साखर उत्पादनाचे आकडे जाहीर करण्यास बंदी; मोठं कारण समोर?
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन
दिल्लीतील अटकेनंतर CJP चा पहिलाच मोठा एल्गार; 7 नोव्हेंबरला आंदोलन!
प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
Praful Patel Met Sharad Pawar : प्रफुल पटेल शरद पवारांच्या भेटीला; भेटीच्या निमित्ताने...
बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं..
Pankaja Munde : बीडच्या साडीची जाहिरात करण्यासाठी पंकजा मुंडे रॅम्प वॉक करणार; नेमकं काय म्हणाल्या?
मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर...
Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी ऑडिओ क्लीपच्या सोअर्स संदर्भात मुख्यमंत्र्यांसमोर  ठेवली अट, म्हणाले...
दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर....
Vivekanand Patil On Farmers Loan : दुष्काळ पडलाय, कर्ज भरू नका; जिल्हा बँकवाले वसुलीसाठी आले तर..., विवेकानंद पाटलांचं शेतकऱ्यांना आवाहन
जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच!
Devendra Fadnavis Vs Rahul Gandhi : जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान, तोपर्यंत लढाई संसदेतच! मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार
शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफी योजनेचा चौथा टप्पा पूर्ण; 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ
एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस...
ST Employees Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; प्रत्येकी एवढ्या हजारांचा बोनस जाहीर