Tejas Thackeray : तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय? केंद्र सरकारला पत्र लिहून पहिली मोठी मागणी

तेजस ठाकरे यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे. या पत्रामुळे तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Tejas Thackeray : तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय? केंद्र सरकारला पत्र लिहून पहिली मोठी मागणी
Tejas thackeray
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 15, 2026 | 8:24 AM

भारतात भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण तापलं आहे. कथित मतचोरीवरून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दिल्लीसहित विविध ठिकाणी आंदोलन केली जात आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कातही विद्यार्थ्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. परंतु आंदोलनाला येण्याआधीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावरून आदित्य, अमित ठाकरे यांनी पोलिसांच्या कारवाईविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता. यावेळी तेजस ठाकरे यांनीही सहभाग दर्शवला होता. आता उद्धव ठाकरेंचे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी झेन-जीच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर थेट केंद्र सरकारला पत्र लिहिलं आहे.

दादरच्या शिवसेना भवनासमोर आदित्य ठाकरेंनी आंदोलकांना घेऊन जाणारी पोलिसांची गाडी अडवली होती. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुंबई पोलिसांवर एकच संताप व्यक्त केला होता. यावेळी तेजस ठाकरे हे देखील झेन-जीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर तेजस ठाकरे यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहलं आहे. तेजस ठाकरे यांच्या पत्रामुळे ते राजकारणात सक्रिय झाल्याचे चर्चा सुरू झाली आहे.

Loading...

दुर्मिळ बोर्ना स्नेकहेड माशाच्या तस्करीच्या मुद्यावर सरकारने लक्ष द्यावे यासाठी, तेजस ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं आहे. पश्चिम बंगालमधील चेल नदीच्या खोऱ्यात हा दुर्मिळ मासा आढळतो. आंतरराष्ट्रीय पाळीव प्राणी व्यापारासाठी बेकायदेशीर शिकार होत असल्याचा पत्रातून दावा करण्यात आला आहे. 2025 मध्ये ठाकरे वन्यजीव प्रतिष्ठानच्या संशोधकांनी शोध लावला आहे.  मर्यादित अधिवासामुळे माशाच्या अस्तित्वाला गंभीर धोका असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.  वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सर्वोच्च संरक्षण देण्याची तेजस ठाकरे आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.  बेकायदेशीर शिकारीला आळा घालण्यासाठी विशेष गस्त पथके तैनात करण्याची मागणी त्यांनी केली आहे.  चेल नदीच्या महत्त्वाच्या भागांत संरक्षित जलचर क्षेत्रे निर्माण करावे, अशी मागणी त्यांनी ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनच्या माध्यमातून केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us