नीलम गोऱ्हे यांच्या नावात “नी” ऐवजी “ची” असायला हवा, सुषमा अंधारे यांची टीका
शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवरुन टीका करताना उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे आडनावावरुन टीका करण्याचे धाडस दाखवले आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी सुरु आहे. या संदर्भात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे आडनावावरुन टीका केली आहे. त्याला सडेतोड उत्तर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिले आहे. सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका करताना पक्ष आणि चिन्हा संबंधित सुरू असलेल्या न्यायालयीन सुनावणीच्या पार्श्वभूमीवर आज गोरे बाईंनी ठाकरे आडनावावर अनावश्यक टिप्पणी केली.त्यांनी केलेल्या टिप्पणीने त्यांचा बुद्ध्यांक लक्षात येत आहे. त्यांच्या नावामध्ये “नि” ऐवजी “ची” असायला हवे होते असे म्हटले आहे.
नीलम गोऱ्हे यांनी सर्वाच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील सुनावणीवरुन पत्रकारांशी बोलताना न्यायालयात एखाद्या खटला चालू असताना विशेषतः सर्वोच्च न्यायालयात असताना न्यायालयावर विश्वास आहे असचं प्रत्येकाने म्हटलं पाहिजे असे म्हटले. हे होणार , ते होणार असे प्रत्येकजण दावे करत असतो. परंतु न्यायदेवतेने एक बाजू ऐकली आहे. ती बाजू अनेक वेळा न्यायालयात मांडली गेली होती. तरीदेखील त्यातील मुद्दे जणू काही पहिल्यांदा सुरू आहेत अशा पद्धतीने माध्यमांत कव्हरेज झालेले आहे.याच मला आश्चर्य वाटतं असेही नीलम गोऱ्हे यांनी यावेळी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील जनतेमध्ये हा पाठ पूर्वीही झाला होता. तरीही जनादेश महायुतीला मिळालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार आणि खासदार निवडून आलेले आहेत.परत सहा खासदार आमच्याकडे आले आहेत. कारण नसताना समाजात गढूळ वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचं हे बोलणं सुरू आहे. पुढील सुनावणी, तारीख आणि त्याचा निर्णय जोवर होत नाही, तोपर्यंत त्यांना टाईमपास म्हणून असे दावे करायचे असतील तर करु देत असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
मला न्यायाधीशांमुळे आत्मविश्वास वाटतो. वकील त्यांच्याजागी मोठे असतात. मुद्दामहून नावं मोठी केली जातात. त्यांचे ती कर्तव्य बजावत असतात. पण बाकीची जी नावं असतात त्यांचं चांगल , वाईटपण काळाने ,अनुभवाने आणि इतिहासाने ठरवलं जाते. त्यामुळे दबावतंत्र न्यायदेवतेसमोर अजिबात चालणार नाही. न्याय देवतेसमोर पुरावे मांडण्यात आलेले आहेत. निवडणूक आयोगासमोर बाजू मांडण्यात आली आहेत. अंतिम निर्णय होईपर्यंत गैरसमज असू नयेत असेही नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या ?
परंतु ही सर्व 2024 च्या पूर्वीची परिस्थिती आहे. 2024 च्या निवडणुकीत महायुतीला जनादेश मिळाला आहे. महाविकास आघाडी एकत्र असून सुध्दा विरोधीपक्ष नेता होऊ शकला नाही. फक्त ढगाचा गडगडाट असावा तसं उबाठा मधला ‘ठ’ काढून ‘ढ’ करावा असं दिसतयं अशी खरमरीत टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्याला उत्तर देताना शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या नावामध्ये “नि” ऐवजी “ची” असायला हवे होते असे म्हटले आहे.