सरकार आल्यानंतर लगेचच कोरोनाचा संसर्ग, तरीही ठाकरे सरकारला 100 पैकी 100 गुण : सुनेत्रा पवार

सरकार आल्यानंतर लगेचच कोरोना आला. मात्र, याकाळातही सरकारने जी कामे केली आहेत, ती समाधानकारक आहेत. | Sunetra Pawar

सरकार आल्यानंतर लगेचच कोरोनाचा संसर्ग, तरीही ठाकरे सरकारला 100 पैकी 100 गुण : सुनेत्रा पवार
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 4:15 PM

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Suntera Pawar) यांनी पदवीधर निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये जाऊन त्यांनी मतदान केले. सुनेत्रा पवार या पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्या आहेत. निवडणूक कुठलीही असो मतदान केले पाहिजे, जे कुणी पदवीधर असतील त्यांनी मतदान केलेच पाहिजेत, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. (Ajit Pawar wife Sunetra Pawar is happy with Thackeray govt performance)

सुनेत्रा पवार यांनी मतदानानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी एक्स्लुझिव्ह संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारला 100 टक्के मार्क्स देईन. सरकार आल्यानंतर लगेचच कोरोना आला. मात्र, याकाळातही सरकारने जी कामे केली आहेत, ती समाधानकारक आहेत, असे म्हणत सुनेत्रा पवार ठाकरे सरकारचे कौतुक केले. जे पण आमदार म्हणून निवडून येतील त्यांनी पदवीधरांचे प्रश्न सोडवले पाहिजेत, पदवीधारांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत, अशी अपेक्षाही सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

राज्यातील औरंगाबाद, पुणे आणि नागपूर या तीन पदवधीर मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्यही आज मतपेटीत बंद होईल. 3 डिसेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाविकासआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ही निवडणूक लढवल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यापैकी पुणे पदवीधर मतदारसंघातील संग्राम देशमुख आणि अरुण लाड यांच्यातील लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय, या मतदारसंघात जवळपास 63 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने ही लढत चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.

पदवीधर निवडणुकीसाठी नोंदणी जोरात पण मतदान केंद्रांवर शुकशुकाट

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोठ्याप्रमाणावर मतदार नोंदणी झाल्याचा दावा केला होता. मात्र, आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर शुकशुकाट दिसून आला. पदवीधर मतदारांच्या या निरुत्साहामुळे या निवडणुकीत मतदानाचा टक्का 20 टक्क्यांच्या पुढे तरी जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

संबंधित बातम्या:

विधान परिषद निवडणूक : 19 दिवसांपासून विना शर्ट प्रचार, अपक्ष उमेदवार उपेंद्र पाटलांनी यवतमाळमध्ये वेधले लक्ष

प्रदेशाध्यक्षांनी खाली पाहिलंच नाही, दादांच्या पायाखालची वाळू कधीच सरकली, सतेज पाटलांचा हल्लाबोल

Graduate Constituency Elections : पुणे पदवीधरचे उमेदवार अभिजीत बिचुकलेंना मतदानाआधीच धक्का

(Ajit Pawar wife Sunetra Pawar is happy with Thackeray govt performance)

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.