प्रदेशाध्यक्षांनी खाली पाहिलंच नाही, दादांच्या पायाखालची वाळू कधीच सरकली, सतेज पाटलांचा हल्लाबोल

गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

प्रदेशाध्यक्षांनी खाली पाहिलंच नाही, दादांच्या पायाखालची वाळू कधीच सरकली, सतेज पाटलांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 1:02 PM

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी पाचही जिल्ह्यात उत्स्फूर्त वातावरण दिसतंय. महाविकास आघाडीचेच उमेदवार प्रश्न सोडवतील हा मतदारांना विश्वास आहे. दरवेळी 37 टक्क्यांपर्यंत होणारं मतदान यावेळी 70 ते 80 टक्के होईल. चंद्रकांतदादाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांनी खाली पाहिले नाही”, असं सतेज पाटील म्हणाले. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. (Satej Patil attack on Chandrakant Patil)

पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत मतदारांची भूमिका स्पष्ट आहे. भाजप आता नाही हे मतदारांचे ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे होणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले.

सिनेसृष्टी मनाने मुंबई सोडून जाणार नाही

“कितीही रेड कार्पेट टाकलं तरी सिनेसृष्टी (Mumbai Bollywood) मनाने मुंबई सोडून जाणार नाही, केंद्र सरकारने दबाव टाकू नये. मुंबईला बदनाम करण्याचं भाजपचं षडयंत्र आहे. सुशांत सिंग प्रकरणानंतर आता बॉलिवूडला लक्ष केलं जातंय. मुंबईचा आत्मा काढून घेण्याचा हा प्रकार आहे. याला महाराष्ट्र भाजपची मान्यता आहे का?

मागच्या पाच वर्षात काय दिवे लावले याचं उत्तर द्या” असा घणाघात यावेळी सतेज पाटलांनी केला.

सुविधा नसत्या तर 50 ते 60 वर्ष बॉलिवूड इथं राहिलं असतं का? मुंबईचं अस्तित्व हिरावून घेण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा सतेज पाटील यांनी यावेळी दिला.

पुणे पदवीधर आणि शिक्षक निवडणूक

राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघासाठी आज (1 डिसेंबर) मतदान पार पडत आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान पार पडेल. तर 3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

?पुण्यात कोणाकोणात सामना?

संग्राम देशमुख (भाजप) vs जयंत आसगावकर (काँग्रेस) vs रुपाली पाटील ठोंबरे (मनसे) vs अभिजीत बिचुकले vs सोमनाथ साळुंखे (वंचित)

?नागपुरातून रिंगणात कोण?

संदीप जोशी (भाजप) vs अभिजित वंजारी (काँग्रेस) vs राहुल वानखेडे (वंचित)

?औरंगाबादमध्ये कोणाकोणात लढत?

शिरीष बोराळकर (भाजप) vs प्रवीण घुगे (भाजप बंडखोर) vs रमेश पोकळे (भाजप बंडखोर) vs नागोराव पांचाळ (वंचित) (Maharashtra Teacher and Graduate Constituency Election 2020 Voting)

(Satej Patil attack on Chandrakant Patil)

संबंधित बातम्या 

Satej Patil | ‘चंद्रकांतदादा, आता संधी गेली..’, सतेज पाटलांचा खोचक टोला 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.