
सागर सुरवसे, सोलापूर : ठाकरे गटाचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे आपल्या सभांमध्ये यांनी भाजपसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंवर (BJP President Chandsrashekhar Bawankule) टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बावनकुळेंवर टीका करताना वेस्ट इंडिजच्या खेळाडूने तोंडावर लगाम लावावा असं म्हटलं होतं. यानंतर भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना जोकरचा ड्रेस मातोश्रीवर पाठवणार असल्याचं म्हटलं होतं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांना किरीट सोमय्यांसाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे ड्रेस पाठवला आहे.
तुमचा भाऊ राज्यभर उघडा फिरतोय त्यामुळे तुमच्या पक्षाचे आणि त्याची इज्जत जात आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांना आम्ही ड्रेस पाठवून देत आहोत, असं शरद कोळी यांनी म्हटलं आहे. त्यासोबतच यावेळी बोलताना, सध्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा जो व्हिडीओ व्हायरल होतोय यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांना थोडी तरी वाटायला पाहिजे. मराठा समाजाला न्याय देण्याऐवजी तुम्ही बिनधास्त आपण एवढे बोलून उठून जायचं असं बोलताय. हे तीन तोंडी सरकार कुठल्याही समाजाला न्याय देणार नाही. जातीच्या नावावर केवळ मत मागतील वाऱ्यावर सोडतील, असं म्हणत शरद कोळी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला होता. याचाच धागा पकडत शरद कोळी यांनी चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं. यावर आता चित्रा वाघ काही प्रत्युत्तर देतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.