अंगणवाडी सेविकांचे फोन वारंवार हँग, अंबरनाथमध्ये निकृष्ट मोबाईल परत करत चांगल्या फोनची मागणी

अंबरनाथच्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या संपूर्ण अंबरनाथ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले.

अंगणवाडी सेविकांचे फोन वारंवार हँग, अंबरनाथमध्ये निकृष्ट मोबाईल परत करत चांगल्या फोनची मागणी
अंगणवाडी सेविकांच्या मोबाईल वापसी आंदोलनाचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 26, 2021 | 7:30 AM

ठाणे : अंबरनाथच्या अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचं समोर आलंय. त्यामुळे त्रस्त झालेल्या संपूर्ण अंबरनाथ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापसी आंदोलन केले.

शासनाच्या वतीने पोषण अभियान कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी सेविकांना 2019 मध्ये शासकीय कामकाज करण्यासाठी मोबाईल देण्यात आले होते. या मोबाईलमध्ये लाभार्थ्यांची नावं, हजेरी, वजन-उंची, तक्ता तसंच गर्भवती महिलांची माहिती, पोषण आहाराचं वाटप या सर्वाबाबत सविस्तर माहिती भरण्यात येते. मात्र या मोबाईलची क्षमता कमी असल्याने माहिती भरताना मोबाईल वारंवार हँग होणं, मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होणं अशा अनेक अडचणी अंगणवाडी सेविकांना काम करताना येतात.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे मोबाईल, दुरुस्तीसाठी 2-3 हजार रुपयांचा खर्च

शासनाने पुरवलेले हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. हे मोबाईल रिपेअरिंगला नेले असता त्यासाठी 2-3 हजार रुपयांचा खर्च सांगितला जात आहे. हा खर्च अल्प मानधनात काम करणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना झेपणाराही नाही. शासनानं दिलेलं पोषण ट्रॅकर ॲप मोबाईलमध्ये रॅम कमी असल्याने डाऊनलोड होत नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना ते आपल्या घरगुती वापरातील मोबाईलमध्ये डाऊनलोड करावं लागत आहे.

अंगणवाडी सेविकांकडून मोबाईल परत करत सामूहिक आंदोलन

विशेष म्हणजे अल्पशिक्षण घेतलेल्या अंगणवाडी सेविकांसाठी शासनाने पुरवलेलं पोषण ट्रॅकर ॲप इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे अनेक सेविकांना इतरांची मदत घ्यावी लागते. मात्र हे काम दैनंदिन स्वरूपाचं असल्यानं रोज इतर व्यक्तींकडून मदत घेणंही शक्य होत नाही. तसंच या ॲपमध्ये डिलिटचा पर्यायच नाही. वर्गवारी किंवा लाभार्थींचे गट बदलणे, दैनंदिन करण्याची कामे इत्यादी सेवांबाबत कोणतेही मार्गदर्शन नाही. ही सर्व प्रक्रिया अतिशय किचकट आहे. त्यामुळेच अंबरनाथ तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरित्या आंदोलन करत शासनाने दिलेले हे मोबाईल परत केलेत.

हेही वाचा :

आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? पुण्यातील अंगणवाडी सेविकांचा सरकारला सवाल

अंगणवाडी सेविका 1 लाख मोबाईल सरकारला परत करणार, नेमकं कारण काय?

बुलडाण्यात अंगणवाडी सेविकांकडून शासनाला मोबाईल परत करण्याचं आंदोलन, ‘हे’ आहे कारण

व्हिडीओ पाहा :

Anganwadi worker return smartphone due to bad quality of mobile in Ambarnath Thane

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.