पुणे : स्तनदा माता, गरोदर महिला आणि मुलाची माहिती अद्यावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडी सेविकांना मोबाईल देण्यात आले आहेत. या सर्वांची माहिती पोषण ट्रँकर या अॅपवर भरायची आहे. मात्र, ती सर्व माहिती इंग्लिश भाषेत भरावी लागत असल्यानं अंगणवाडी सेविकांची अडचण होत आहे. इंग्लिश येत नसल्याने आता आम्ही या वयात इंग्रजी शिकायची का? असा संतप्त सवाल अंगणवाडी सेविकांनी विचारला आहे.