बुलडाण्यात अंगणवाडी सेविकांकडून शासनाला मोबाईल परत करण्याचं आंदोलन, ‘हे’ आहे कारण

राज्यातील अंगणवाड्यांचा कारभार डिजीटल करण्यासाठी शासनानं 2019 मध्ये सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप केले. मात्र या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना मदती ऐवजी अनेक अडचणीच येऊ लागल्या. त्यामुळे संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आता हे मोबाईल शासनाकडे परत करायला सुरुवात केलीय.

बुलडाण्यात अंगणवाडी सेविकांकडून शासनाला मोबाईल परत करण्याचं आंदोलन, 'हे' आहे कारण
अंगणवाडी सेविकांच्या मोबाईल वापसी आंदोलनाचा प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 18, 2021 | 11:30 AM

बुलडाणा : राज्यातील अंगणवाड्यांचा कारभार डिजीटल करण्यासाठी शासनानं 2019 मध्ये सर्व अंगणवाडी सेविकांना मोबाईलचे वाटप केले. मात्र या मोबाईलमुळे अंगणवाडी सेविकांना मदती ऐवजी अनेक अडचणीच येऊ लागल्या. त्यामुळे संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आता हे मोबाईल शासनाकडे परत करायला सुरुवात केलीय. बुलडाणामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी एकत्र येऊन आयटक संघटनेच्या माध्यमातून मोबाईल परत करत आंदोलन केलं.

शासनाचा अजब प्रकार, मराठी अॅप बदलून अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेतील अॅप

अंगणवाडी सेविकांना शासनाने मोबाईल देऊन त्यामध्ये कॅश नावाचे मराठी भाषेतील मोबाईल अॅप दिले. त्याच्या माध्यमातून अंगणवाडीशी संबंधित सर्व माहिती अपलोड करता येत होती. मात्र आता शासनाने त्यामध्ये बदल करून पोषण ट्रॅकर म्हणून इंग्रजी भाषेतील ॲप दिलेय. मात्र, ज्या महिलांनी बालवाडीपासून सुरुवात केली आणि आता अंगणवाडीवर काम करत आहेत त्यापैकी बहुतांश सेविकांचे शिक्षण जेमतेम आठवीपर्यंत झालेले आहे. अशा सर्व अंगणवाडी सेविकांना इंग्रजी भाषेतील अॅपमुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत.

शासनाला वारंवार अडचणी सांगूनही उपाययोजना नाही, अखेर आंदोलनाचा बडगा

कर्मचाऱ्यांनी भाषेची अडचण वारंवार शासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही यावर दखल घेतली नसल्याने अखेर संपूर्ण राज्यातील अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक तालुक्याच्या CDPO कडे हे मोबाईल परत करण्याला सुरुवात केलीय. जोपर्यंत ॲपमध्ये मराठी माध्यम येत नाही तोपर्यंत मोबाईलवर काम करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिलाय. शिवाय वेळोवेळी मोबाईल खराब होतात आणि त्याचा खर्च सेविकांना करावा लागतोय, अशीही तक्रार केलीय.

हेही वाचा :

वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून अजून एक आत्महत्या?, यवतमाळ जिल्हा परिषदेवर ‘आयटक’चा धडक मोर्चा

व्हिडीओ पाहा :

Anganwadi worker return government smart phone in Buldhana

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.