तेव्हा अल्लाहू अकबर करुन उद्धव ठाकरे नळबाजारात नाचत होता – नितेश राणे

पहिलीपासून हिंदी सक्तीची केली तर शाळा बंद पाडू असं राज ठाकरेंनी म्हटलय त्यावर नितेश राणे म्हणाले की, "शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. तिथे दहशतवादी घडवण्याशिवाय काही होत नाही”

तेव्हा अल्लाहू अकबर करुन उद्धव ठाकरे नळबाजारात नाचत होता - नितेश राणे
Nitesh Rane-Uddhav Thackeray
| Updated on: Jul 19, 2025 | 12:16 PM

नितेश राणे यांनी यावेळी पत्रकारांसमोर मोबाइलमधील व्हिडिओ क्लिपही दाखवली. “यांच्या थोबाडातून मराठी कधी निघणार? यांना सूट दिलीय का, आम्हाला धमक्या देण्याची. यांना इस्लामी राष्ट्र बनवायचं आहे. हिंदू समाज संपवायचा आहे. त्यांना कोणी बोलत नाही. नया नगरमध्ये कोणाला मराठी बोलायला लावत नाही. उगाच गरीब हिंदुंना मारायचं” असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत म्हणतात निशिकांत दुबेबद्दल भाजपमध्ये कोणी बोललं नाही. त्यावर नितेश राणे यांनी उत्तर दिलं. “संजय राजाराम राऊतच वय झालय. त्याला कळत नाही. आशिष शेलारांनी विधान परिषदेत भाषण केलय. पाहिजे तर त्याला टेपरेकॉटर पाठवतो. त्याच्या ज्ञानात भर पडेल. भाजपने पहिला विरोध केला. निशिकांत दुबे जे बोलले ते आम्हाला मान्य नाही. हिंदू म्हणून आम्ही आपसात का भांडावं? नया नगर, भेंडीबाजारमध्ये शीर कुर्मा, बिर्याणीची पार्टी व्हावी म्हणून?” असं नितेश राणे बोलले.

‘तेव्हा निवडणूक आयोग वाईट नाही वाटला का?’

सामनामध्ये आज आलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीच्या प्रश्नावर ते म्हणाले की, ‘मी सामना नाही वापरतं, माझ्याकडे पाणी येतं’. निवडणूक आयोग शेंदूर फासलेला धोंडा आहे या उद्धव ठाकरेंच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. “लोकसभेला याचे खासदार निवडून आले, ते पण निवडणूक आयोगाने दिले. तेव्हा निवडणूक आयोग वाईट नाही वाटला का? तेव्हा हा अल्लाहू अकबर करुन नळबाजारात नाचत होता. तेव्हा निवडणूक आयोग का वाईट वाटला नाही” असा सवाल नितेश राणेंनी केला.

“ठाकरे नावाचा ब्रँड हा फक्त बाळासाहेब ठाकरे यांचा होता. हे लोक जिहाद्यांच्या, हिरव्या सापाच्या प्रेमात पडले. मग ही चूक आमची की त्यांची?. त्यांनी हिंदुत्व सोडलं” अशी टीका नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली.

‘शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा’

पहिलीपासून हिंदी सक्तीची केली तर शाळा बंद पाडू असं राज ठाकरेंनी म्हटलय त्यावर नितेश राणे म्हणाले की, “शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. तिथे दहशतवादी घडवण्याशिवाय काही होत नाही” “बुलढाण्याच्या मदरशात येमेनचे नागरिक सापडले. जिलेटीनच्या कांड्या सापडल्या, तलवारी सापडल्या. हिंदू समाजात भांडण लावण्यापेक्षा मदरसे बंद करु टाका. शिक्षण कुठे आहे तिथे दहशतवादाचे अड्डे आहेत” असं नितेश राणे म्हणाले.