…तर भाजप रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करेल, भाजप आमदाराचा केडीएमसी प्रशासनाला इशारा

| Updated on: Feb 17, 2021 | 10:29 PM

कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे (BJP MLA Ravindra Chavan warn to KDMC).

...तर भाजप रस्त्यावर उतरुन उग्र आंदोलन करेल, भाजप आमदाराचा केडीएमसी प्रशासनाला इशारा
Follow us on

कल्याण (ठाणे) : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. या दरम्यान भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी बुधवारी (17 फेब्रुवारी) महापालिका आयुक्ती विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. आयुक्तांसोबतच्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतील. आयुक्तांनी विकास कामांसाठी डेडलाईन दिली आहे. त्या डेडलाईनमध्ये कामं झाली नाहीत तर भाजप आक्रमक होईल”, असा इशार त्यांनी यावेळी दिला (BJP MLA Ravindra Chavan warn to KDMC).

“महापालिका हद्दीतील विविध विकास कामे रखडलेली आहे. ती मार्गी लावली जावीत. त्यासाठी आयुक्तांसोबत चर्चा करण्यात आली आहे. त्या विकास कामाकरीता एक डेडलाईन त्यांच्याकडून ठरवून घेतली आहे. या डेडलाईनच्या आत विकास कामे मार्गी लावली नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात उग्र आंदोलन करणार”, असा इशारा आमदार चव्हाण यांनी दिला. या बैठकीत भाजप माजी गटनेता शैलेश धात्रक, माझी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कल्याण-शीळ रस्त्याचे सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केला आहे. हे काम सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली करण्यात यावे, अशी मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.

“हा रस्ता महापालिकेच्या हद्दीतून जातो. या रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ खाजगी कंत्रटदाराच्या माध्यमातून करीत आहे. मात्र त्यात महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे. रस्त्याचे काम निकृष्ट आहे. त्याठिकाणी पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्याचे काम सुरु असताना काही अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यासाठी हे काम सीसीटीव्हीच्या  निगराणीखाली करण्यात यावे”, अशी देखील मागणी रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली (BJP MLA Ravindra Chavan warn to KDMC).

हेही वाचा : लावारीस, फुटपाथवरील गरिबांना महापालिका रुग्णालयात जागा नाही? कल्याणमधील मन हेलावून टाकणारी घटना