AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लावारीस, फुटपाथवरील गरिबांना महापालिका रुग्णालयात जागा नाही? कल्याणमधील मन हेलावून टाकणारी घटना

रात्रीच्या अंधारात रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आजारी वयोवृद्धाला फूटपाथवर सोडलं. त्यामुळे वयोवृद्धाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे (Old man death on footpath in Kalyan).

लावारीस, फुटपाथवरील गरिबांना महापालिका रुग्णालयात जागा नाही? कल्याणमधील मन हेलावून टाकणारी घटना
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 17, 2021 | 7:07 PM
Share

ठाणे : फूटपाथवर बसणारे गरीब, होतकरु नागरिकांचा कुणी वाली आहे की नाही? असा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कारण यासंबंधित कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. फूटपाथवर आजारी असलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला समाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णलायात दाखल केले. मात्र, रात्रीच्या अंधारात रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आजारी वयोवृद्धाला पुन्हा त्याच फूटपाथवर सोडलं. त्यामुळे वयोवृद्धाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे (Old man death on footpath in Kalyan).

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात फूटपाथवर एक 60 वर्षीय वृद्ध पडला होता. तो आजारी असल्याचे निदर्शनास येताच सामाजिक कार्यकर्ते उमेश बोरगावकर यांनी पोलीस आणि रुग्णालय प्रशासनास संपर्क साधला. या व्यक्तीला त्वरीत उपचार मिळाले पाहिजेत यासाठी बाजारपेठ पोलिसांनी गंभीर दखल घेत त्या व्यक्तिला रुक्मीणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आज सकाळी त्याच फूटपाथवर ही व्यक्ती आढळून आल्याने नागरीकही हैराण झाले.

दरम्यान, ज्या व्यक्तीला उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले तो पुन्हा फूटपाथवर कसा आला? असा प्रश्न स्थानिकांना पडला. संबंधित वृद्धाचे नाव-गाव, पत्ता नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधारात मरणासाठी फूटपाथवर सोडले, असा आरोप उमेश बोरगावकर यांनी केला. “ही अत्यंत निंदनीय घटना आहे. यासाठी जो कोणी जबाबदार आहे. त्यांच्या विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मृत व्यक्तीचे नाव शांताराम असल्याचे समोर आलं आहे. याबाबत आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्या एका मिटींगमध्ये व्यस्त असल्याचे त्यांनी सांगितले (Old man death on footpath in Kalyan) .

या प्रकरणी आम्ही केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. “संबंधित रुग्णाला दोन व्यक्ती रुग्णालयात घेऊन आले होते. त्यांना केस पेपर काढण्यास सांगण्यात आलं. मात्र, त्यांनी केस पेपर न काढता ते रुग्णाला तेथून घेऊन गेले, अशी प्राथमिक माहिती मिळाली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

हेही वाचा : चंद्रपुरात लस घेतलेला डॉक्टर कोरोनाबाधित, प्रशासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र सील

Follow Us
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?