ठाण्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती, सिनेगॉग चौक सील, रस्ते बंद, प्रचंड मोठ्या हालचाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहर एका धक्कादायक वृत्तामुळे हादरलं आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. संबंधित परिसर सील करण्यात आलाय.

ठाण्यात बॉम्ब ठेवल्याची माहिती, सिनेगॉग चौक सील, रस्ते बंद, प्रचंड मोठ्या हालचाली
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 3:21 PM

गणेश थोरात, Tv9 मराठी, ठाणे | 28 डिसेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ठाणे शहर एका धक्कादायक वृत्तामुळे हादरलं आहे. ठाण्यातील सिनेगॉग चौकात बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. सिनगॉग चौकातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात हा बॉम्ब ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पण या माहितीत कितपत तथ्य आहे, याची पुष्टी करता येणार आहे. या बॉम्बबाबतची माहिती एका अज्ञात ई-मेलद्वारे देण्यात आली आहे. संबंधित माहिती समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलिसांनी या माहितीचं गांभीर्य ओळखून तातडीने शोधकार्याला सुरुवात केली आहे. ठाण्याच्या सिनेगॉग चौकात प्रचंड मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात झालाय. परिसरात अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत.

सिनेगॉग चौकातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. हा मेल प्राप्त झाल्यानंतर तातडीने पोलिसांचा भलामोठा फौजफाटा सिनेगॉग परसिरात दाखल झाला. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालंय. पोलिसांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सिनेगॉग चौकातील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. चौकातील सर्व दुकाने बंद करण्यात आले आहेत. परिसरात शुकशुकाट आहे. चारही बाजूचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. घटनास्थळी राज्य राखीव पोलीस दल, पोलीस खात्यातील सर्व वरिष्ठ पातळीवरचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बॉम्ब शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु

प्रार्थनास्थळाच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. सर्वत्र बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. प्रार्थनास्थळात बॉम्ब शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. तसेच याबाबतचा ई-मेल नेमका कुणी पाठवला आहे, याबाबतचा तपासही पोलीस करत आहेत. मेल प्राप्त झाल्यानंतर सर्व खबरदारी घेणं हे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांचं काम आहे. ते त्या दृष्टीकोनाने तपास करत आहेत. त्यानुसार त्यांनी बॅरिकेट्स लावून, चारही बाजूचे रस्ते बंद करुन आपलं काम सुरु केलं आहे.

या शोध मोहिमेत खरंच बॉम्ब सापडतो का, हे पुढच्या काही तासांमध्ये समोर येईल. पण अशाप्रकारे बॉम्ब हल्ल्याचे ईमेल सध्या सातत्याने येत आहेत. नुकतंच मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यालयात तसाच आशयाचा एक ई-मेल आला होता. त्यामध्ये मुंबईतील काही भागांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर आता ठाण्यात बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल आला आहे. या प्रकरणी पोलिसांची कारवाई सुरु आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.