Lok Sabha elections 2024 Phase 3 : सुप्रिया सुळे, नारायण राणे, शाहु महाराज, उदयनराजे भोसले यांचे भवितव्य ठरणार

18 व्या लोकसभेसाठी देशभरात सात टप्प्यात निवडणूका जाहीर झाल्या आहेत. महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूकीचे मतदान होणार आहे. आतापर्यंत दोन टप्पे पार पडले आहेत. तर तिसऱ्या टप्प्याचे मतदान येत्या 7 मे रोजी होत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचाराची आज सांगता झाली आहे. भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना सह अनेक पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद होणार आहे.

Lok Sabha elections 2024 Phase 3 : सुप्रिया सुळे, नारायण राणे, शाहु महाराज, उदयनराजे भोसले यांचे भवितव्य ठरणार
Lok Sabha elections 2024 Phase 3Image Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 05, 2024 | 7:14 PM

मुंबई : देशभरात लोकसभेच्या निवडणूकांनी राजकारण तापले आहे. लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसरा टप्प्यासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात मतदान होणार आहे. लोकसभा 2024 निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कोल्हापूरचे शाहू महाराज, शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, शिवराज सिंह चौहान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, डींपल यादव, शिवराज सिंह चौहान आदी नशीब आजमाविणार आहेत. 7 मे रोजी लोकसभा 2024 च्या निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यात 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून होणाऱ्या मतदानात एकूण 1,351 उमेदवार नशिब आजमाविणार आहेत. तिसऱ्या टप्प्यासाठी गुजरात राज्यातून 26 लोकसभा मतदार संघातून सर्वाधिक 658 उमेदवारी अर्ज आले. तर त्याखालोखाल महाराष्ट्रातील 11 लोकसभा जागांतून 519 उमेदवारी अर्ज आल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

तिसरा टप्पा – 7 मे रोजी मतदान

रायगड –

अनंत गीते ( ठाकरे ) विरुद्ध सुनील तटकरे ( अजित पवार )

रायगड लोकसभा मतदार संघातून यंदा शिवसेना ( उबाठा ) गटाचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची प्रमुख लढत होणार आहे. रायगड मतदार संघात साल 2019 च्या निवडणूकीत अखंड राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अखंड शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांचा पराभव केला होता. साल 2014 च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचा केवळ दोन हजार मतांनी पराभव झाला होता. तटकरे यांचा पराभव ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे महाविकास आघाडीत असलेल्या शेकापचे आमदार जयंत पवार यांचे विधान यंदा चर्चेचे ठरले होते.

बारामती –

सुप्रिया सुळे ( शरद पवार ) विरुद्ध सुनेत्रा पवार ( राष्ट्रवादी अजित पवार )

यंदा बारामती लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातच ही लढत होत आहे. नणंद आणि भावजय असा फॅमिली ड्रामा यावेळी चुरशीचा होणार आहे. या निवडणूकीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात शरद पवार यांचे पुतणे आणि सुप्रिया यांचे चुलत बंधू अजितदादा पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना उभे करण्यात आले आहे. या निवडणूकीचा निकाल शरद पवार आपला फुटलेला पक्ष पुन्हा सावरतात की अजित पवार यांच्या सोबत उरलेले सुभेदार जातात याचा निर्णय घेणारी ठरणार आहे. त्यामुळे बारामतीचा गड जिंकण्याचा भाजपाने केलेला पण यशस्वी होतो का ? हे येणारा काळ ठरविणार आहे. यावर येत्या 7 मे रोजी बारामतीकर आपले मत नोंदविणार आहेत.

धाराशीव –

ओमराजे निंबाळकर ( ठाकरे ) विरुद्ध अर्चना पाटील ( राष्ट्रवादी अजित पवार )

धाराशीव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने ( अजित गट ) तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना तिकीट दिले आहे. त्यांचा सामना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्याशी होणार आहे. धाराशिवमध्ये ( उस्मानाबाद ) भाजपा कोणाला तिकीट देणार याची उत्सुकता होती. अखेर धाराशिव जि.प.च्या माजी अध्यक्ष अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाली. पाटील यांना स्थानिक भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांची किती साथ मिळणार आणि सध्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना सहानुभूती मिळणार की नाही यावर सर्व अवलंबून आहे. अखंड राष्ट्रवादी आणि अखंड शिवसेना यांनी धाराशीवमध्ये आलटून पालटून सत्ता मिळविली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी सुहानुभूती मिळाली तरच सीटींग खासदाराला पुन्हा संधी मिळू शकते.

लातूर –

शिवाजी काळगे ( कॉंग्रेस ) विरुद्ध सुधाकर श्रृंगारे ( भाजपा )

लातूर लोकसभेसाठी यंदा कॉंग्रेसने डॉ. शिवाजी काळगे यांना तिकीट दिले आहे. लातूर हा मतदार संघ अनुसूचित जमाती साठी राखीव मतदार संघ आहे. डॉ. काळगे यांना निवडून आणण्यासाठी अमित देशमुख यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. राजकारणात नवखे असलेले काळगे 1997 पासून नेत्र शल्य चिकीत्सक आहेत. काळगे हे हिंदू माला जंगम जातीचे आहेत. लिंगायत समाज माला जंगम समाजाला गुरु मानतो असे समीकरण हेरुन ही उमेदवारी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील राणी अंकुलगा हे काळगे यांचे मूळ गाव. त्यांचे वडील शेकापचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी साल 2014 मध्ये भाजपाकडे तर साल 2019 मध्ये कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली होती.

सोलापूर –

प्रणिती शिंदे ( कॉंग्रेस ) विरुद्ध राम सातपुते (भाजपा )

सोलापूरात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी उभ्या राहील्या आहेत. त्यांच्या विरोधात भाजपाने राम सातपुते यांना तिकीट दिले आहे. राम सातपुते माळशिरसचे आमदार आहेत. प्रणिती शिंदे सोलापूरचा तीन वेळा आमदार झाल्या आहेत. साल 2009 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रणिती शिंदे यांना लोकसभेत प्रथमच उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्यावर बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता मतदार संघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

माढा –

रणजितसिंह नाईक निंबाळकर ( भाजपा ) विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील ( शरद पवार )

माढा लोकसभा निवडणूक यंदा रंगतदार होणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केल्याने निवडणूकीतील रंगत वाढली आहे. माढ्यात भाजपाचे रणजितसिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते – पाटील यांच्यात कडी टक्कर होणार आहे. रणजितसिंह निंबाळकर यांना तिकीट दिल्याने मोहिते पाटील घराणे भाजपावर प्रचंड नाराज झाले होते. पश्चिम महाराष्ट्रात माढा मतदार संघाची साल 2008 रोजी स्थापना झाल्यानंतर शरद पवार येथून निवडून आले होते. सोलापूर आणि सातारा मतदार संघाला लागून असलेल्या या मतदार संघात शरद पवार यांचा एकेकाळी दबदबा होता. साल 2014 च्या मोदी लाटेत अखंड राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते-पाटील माढ्यातून विजयी झाले होते. परंतू साल 2019 ला आपले पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्याची त्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळे या मतदार संघात भाजपाचे वर्चस्व झाले. दरम्यान, सातारा जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर निवडून आले.

सांगली –

संजयकाका पाटील ( भाजपा ) – चंद्राहार पाटील ( ठाकरे ) – विशाल पाटील ( अपक्ष )

महाविकास आघाडीत सांगलीचा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाने ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजेचे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करुन सर्वांना धक्का दिला होता. कॉंग्रेसचे विशाल पाटील या मतदार संघात लढायची तयारी करीत होती. त्यांनी अखेर बंडखोरी करीत अर्ज दाखल झाला आहे. भाजपाने संजयकाका पाटील यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने अचानक पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मातोश्रीतून जाहीर केली होती. तर कॉंग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक आता तिरंगी होणार आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग –

विनायक राऊत ( ठाकरे ) विरुद्ध नारायण राणे ( भाजपा )

शिवसेना ठाकरे गटाने रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून विनायक राऊत यांना पुन्हा संधी दिली आहे. तर भाजपाने अखेर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाच त्यांच्या समोर उभे केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यातच ही लढत रंगणार आहे. कोकण शिवसेनेचा पारंपारिक गड आहे. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही येथे उद्धव ठाकरे यांचे वर्चस्व राहीले आहे. साल 2009 मध्ये नारायण राणे यांचे पूत्र नीलेश राणे यांचा विजय झाला होता. तर साल 2014 आणि साल 2019 मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत येथे निवडून आले आहेत.

कोल्हापूर –

शाहु महाराज ( कॉंग्रेस ) विरुद्ध संजय मंडलिक ( भाजपा )

कोल्हापूरात कॉंग्रेसने शाही घराण्याचे छत्रपती शाहु महाराजांचे वंशज शाहु महाराज यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने त्यांच्या विरोधात संजय मंडलिक यांना तिकीट दिले आहे. या मतदार संघातून सदाशिवराव मंडलिक चार वेळा खासदार झाले आहेत. 1998 मध्ये सदाशिवराव मंडलिक कॉंग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. 1999मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन त्यांनी 1999 आणि 2004 मध्ये निवडणूक जिंकली. साल 2009 मध्ये अपक्ष म्हणून ते निवडून आले. साल 2014 मध्ये येथून राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक विजयी झाले. तर साल 2019 मध्ये येथून अखंड शिवसेनेचे संजय मंडलिक विजयी झाले. आता संजय मंडलिक शिंदे सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवित आहेत.

हातकणंगले

धैर्यशील माने ( शिंदे ) – राजू शेट्टी ( स्वाभीमानी पक्ष ) – सत्यजित पाटील सरुडकर ( ठाकरे )

कोल्हापूरच्या हातकणंगले मतदार संघात यंदा शिंदे शिवसेना गटाचे खासदार धैर्यशील माने, उद्धव ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, वंचित बहुजन आघाडीचे डी.सी. पाटील आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यात लढत होणार आहे. आधी या मतदार संघात उमेदवार बदलाची चर्चा होती. शिंदे सेनेच्या विरोधात नाराजी होती. आता भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजितदादा राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र प्रचार करीत आहेत.

अमित शाह :

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह गुजरातच्या गांधी नगर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. साल 2019 मध्ये अमित शाह यांनी कॉंग्रेसच्या सी.जे.चावडा यांचा 5.55 लाख मतांनी पराभव केला होता. साल 1989 पासून भाजपा ही जागा जिंकत आली आहे. यंदा पेशाने आर्कीटेक्ट असलेल्या 62 वर्षीय सोनल पटेल अमित शाह यांच्या समोर निवडणूकीला उभ्या राहील्या आहेत. सोनल पटेल या साल 1992 साली कॉंग्रेसशी जुळल्या होत्या. अमित शाह आपला या मतदार संघातील दुसरा विजय दहा लाखांच्या मताने साजरा करण्यासाठी सज्ज झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. ही काही राजकीय आत्महत्या नाही तर एक चॅलेंज असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

डींपल यादव :

समाजवादी पार्टीच्या उमेदवार डींपल यादव या उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या मैनीपुरी येथून उभ्या आहेत. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सासरे मुलायम सिंह यादव यांच्या निधनानंतर झालेल्या पोट निवडणूकीत साल 2022 मध्ये डींपल यादव विजयी झाल्या होत्या. डींपल यादव तीन वेळा खासदार राहिल्या असून भाजपाच्या जयवीर सिंह यांच्याशी मुलायम सिंह यांचा वारसा वाचविण्याची त्यांची लढाई आहे.

ज्योतिरादित्य शिंदे :

केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे भाजपाच्या तिकीटावर गुना मतदार संघातून निवडणूक लढवित आहेत. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या ज्योतिरादित्य यांनी त्यांच्यावर टीका करीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांचा मुकाबला कॉंग्रेसच्या राव यादवेंद्र सिंह यांच्याशी आहे. साल 2019 मध्ये कॉंग्रेसमध्ये असताना शिंदे यांचा भाजपाच्या कृष्णा पाल सिंह यांनी पराभव केला होता.

शिवराज सिंह चौहान :

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते शिवराज सिंह चौहान विदिशा लोकसभा मतदारसंघातून नशीब आजमावित आहेत. मध्य प्रदेशचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले शिवराज सिंह चौहान विदिशातून पाच वेळा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. या लोकसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांचा मुकाबला काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा यांच्याशी होणार आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.